पोलीस असल्याचे सांगत तरुणाचे अपहरण; चार लाखांसाठी रचला कट

रोशन खैरनार
Friday, 9 October 2020

सनी धनंजय आहिरे हा चायनीज हातगाड्याचा व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी  पांढऱ्या तवेरा गाडीतून चार जण त्याच्या हातगाडीजवळ आले आणि त्यांनी बळजबरीने सनीला वाहनात बसविले. त्यानंतर....

चार लाखांसाठी सटाण्यात तरुणाचे अपहरण 
पोलिस असल्याची बतावणी; दोघांना अटक, दोघे फरारी 

नाशिक / सटाणा :सनी धनंजय आहिरे हा चायनीज हातगाड्याचा व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी  पांढऱ्या तवेरा गाडीतून चार जण त्याच्या हातगाडीजवळ आले आणि त्यांनी बळजबरीने सनीला वाहनात बसविले. त्यानंतर....

अशी घडली घटना

शहरातील सनी धनंजय आहिरे (वय २७, रा. मुळाणे, ता. बागलाण) शहरातील दोधेश्वर नाक्यावर चायनीज हातगाड्याचा व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी (ता.६) दुपारी पावणेतीनला पांढऱ्या तवेरा गाडीतून चार जण त्याच्या हातगाडीजवळ आले आणि त्यांनी बळजबरीने सनीला वाहनात बसविले. सनीने गाडीतील संशयित विकी गुर्जर (२९) चालक जयेश जाधव यांना ओळखले. यानंतर त्यांनी सनीला मालेगावमार्गे आघार रावळगाव फाटा येथे नेत आणखी दोघांना गाडीत घेतले. चौघांच्या बोलण्यातून एकाचे नाव पोलार्ड, तर एकाचे नाव जाधव असल्याचे समजले.

एक लाख ८० हजार रुपये आणून दे, नाही तर तुला बघून घेऊ,’

यानंतर संशयित जाधव याने ‘मी पोलिस आहे, तुझ्या घरी फोन लाव व चार लाख रुपये पाहिजे,’ असे सांग. सनीने घरी आईला फोन लावत आईने, ‘आमच्याकडे इतके पैसे नाही,’ असे सांगितले. यानंतर संशयितांनी फोन कट करत सनीस बेदम मारहाण केली. या वेळी त्यांनी चार लाखांवरून दोन लाख घरी माग, असे सांगितले. त्यानंतर सनीने तत्काळ घरच्यांना खात्यावर वीस हजार रुपये टाकण्यास सांगितले. यानंतर शहरातील मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून सनीने वीस हजार रुपये काढून जयेश जाधवला दिले. त्यानंतर रात्री साडेआठला त्यांनी सनीला भाक्षी रस्त्यावरील नव्याने झालेल्या रिंग रोड परिसरात सोडत ‘उद्या दुपारी बारापर्यंत उर्वरित एक लाख ८० हजार रुपये आणून दे, नाही तर तुला बघून घेऊ,’ असा दम दिला. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

दोन संशयित फरारी
यानंतर सनीने घरी येत कुटुंबीयांसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेने गांभीर्य ओळखून संशयित विकी गुर्जर आणि जयेश जाधव यांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. घटनेतील इतर दोन संशयित फरारी असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहे.  

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दोधेश्वर नाक्यावर चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाचे चार जणांनी चार लाखांसाठी अपहरण केले. याप्रकरणी सनी आहिरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली. घटनेतील दोन संशयित फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. यात संशयितांनी आम्ही पोलिस असल्याची बतावणी केली. 

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnapping youth in satana nashik marathi news