तर दोनऐवजी एकचवेळ पाणीपुरवठा! नाशिककरांवर पाणीकपातीचे ढग गडद

lack of rain fall shortage of water supply in nashik city marathi news
lack of rain fall shortage of water supply in nashik city marathi news

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणे अपेक्षेप्रमाणे भरली नाहीत. त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे काळे ढग जमा झाले आहेत. पाटबंधारे विभागाने महापालिकेला ३ ऑगस्टचा पाणीसाठा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे पत्र देताना कायदेशीर अडचणीतून स्वतःची सुटका करून घेतली आहे, तर महापालिकेनेही पत्राचा आधार घेऊन कपातीचे धोरण अवलंबिण्याची तयारी केली आहे. अर्थात, प्रशासनही कोरोनोच्या परिस्थितीत कायदेशीर मुद्यात न अडकता महासभेच्या कोर्टात चेंडू टोलावणार आहे. 

धरणांमध्ये ५२ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या जेमतेम ५२ टक्के पाणीसाठा आहे. पावसाचे जून, जुलै हे दोन महिने गेले. ऑगस्टमध्येही जोरदार पावसाची चिन्हे नाहीत. त्यापार्श्‍वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत धरणांचा आढावा घेतला. त्या वेळी गरज असेल तेथे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठविले असून, ३ ऑगस्टला धरणांमध्ये असलेल्या जलसाठ्याचा विचार करून पाणीवापराचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

तर दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा

आठवडाभरात दमदार पाऊस न झाल्यास महापालिकेकडून दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com