लासलगावला कामगारांअभावी 'कांदा लिलाव बंद'....कांदा व्यापारीही सहभागी होण्यास दाखवताय असमर्थता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कामगार व्यापाऱ्यांच्या गुदामावर कांदा निवडण्या पासून ते गाडीमध्ये कांदा भरण्यापर्यंतच्या कामासाठी न आल्यामुळे कांद्याच्या लिलावानंतर घेतलेल्या कांद्याचा निकास कसा करावा, या प्रश्‍नांमुळे कांदा व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याने व्यापाऱ्यांनी थेट कांदा लिलावासाठी न जाण्याची भूमिका घेतल्यामुळे कांद्याचे सुरू झालेले लिलाव बंद पडले होते. आलेल्या कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत चर्चेनंतर लिलाव सुरू झाले. 

नाशिक : (लासलगाव) जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फटका लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावाला बसला आहे. कामगार कामावर न आल्याने घेतलेल्या कांद्याचा निकास कसा करावा? या विवंचनेने कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे काही काळ लिलाव बंद होते. मात्र सभापती, पोलिसांच्या सूचनेनंतर लिलाव पूर्ववत झाले. 

व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत चर्चेनंतर लिलाव सुरू

लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता. 23) एक हजार 257 वाहनांतून 20 हजार 612 क्विंटल लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. लाल कांद्याला जास्तीत जास्त एक हजार 327 रुपये, सरासरी एक हजार 100, तर कमीत कमी 650 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त एक हजार 461 रुपये, सरासरी एक हजार 200, तर कमीत कमी 900 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाले. येथील कांद्याच्या बाजारपेठेत जमावबंदी आदेश आणि कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लासलगाव परिसरातील कामगार व्यापाऱ्यांच्या गुदामावर कांदा निवडण्या पासून ते गाडीमध्ये कांदा भरण्यापर्यंतच्या कामासाठी न आल्यामुळे कांद्याच्या लिलावानंतर घेतलेल्या कांद्याचा निकास कसा करावा, या प्रश्‍नांमुळे कांदा व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याने व्यापाऱ्यांनी थेट कांदा लिलावासाठी न जाण्याची भूमिका घेतल्यामुळे कांद्याचे सुरू झालेले लिलाव बंद पडले होते. आलेल्या कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत चर्चेनंतर लिलाव सुरू झाले. 

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

मात्र, मंगळवारी आणि बुधवारी सुटी असल्याने गुरुवार (ता. 26)पासून कांद्याच्या लिलावात सहभागी होणार नसल्याचा थेट इशारा कांदा व्यापारी दिल्याने भविष्यात 
कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि कामगारांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी आणि 
व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेऊन कांद्याचे लिलाव कसे सुरळीत राहतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप सांगितले.  

हेही वाचा > ''त्याने' शाप दिला म्हणूनच कोरोनाची साथ पसरलीय!'...अन् महिलांनी चक्क लावलेले दिवे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasalgaon for lack of workers Onion auction closed nashik marathi news