लासलगावला कांद्याच्या दरात सुधारणा; कांद्याची घाऊक बाजारात पुन्हा उसळी  

अरुण खंगाळ
Tuesday, 13 October 2020

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात पुन्हा उसळी घेतली आहे,

लासलगाव(जि.नाशिक) : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात पुन्हा उसळी घेतली आहे,

बहुतांश कांदा पावसामुळे सडला

शनिवारच्या तुलनेत कांदा दरात ५५० रुपयांची सरासरी वाढ होत सोमवारी (ता. १२) येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी चार हजार १०० रुपये प्रतिक्विंटल, तर कमाल चार हजार ५५२ रुपये भाव मिळाला. राज्यातील बहुतांश कांदा पावसामुळे सडून गेला आहे. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या कांद्यावर वर्षांचे गणित अवलंबून असताना कांदा उत्पादकांचे गणित निर्यातबंदीमुळे विस्कटलेले गेले असल्याचे चित्र दिसत आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर उन्हाळ कांद्याची ५६९ वाहनांतून ६,२०० क्विंटल आवक होऊन कांद्याला किमान एक हजार, तर सरासरी चार हजार १००, तर कमाल चार हजार ५५२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasalgaon onion price improvement nashik marathi news