esakal | VIDEO : राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही - जितेंद्र आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad.jpg

गेली चाळीस वर्षे भाजपने प्रभू श्रीरामाचंद्रांच्या नावावर राजकारण केले, हे अख्ख्या जगाने पाहिले. पण श्रीराम कोणाच्या सातबार्‍यावर नाही. राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे.

VIDEO : राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही - जितेंद्र आव्हाड

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : (सिडको) गेली चाळीस वर्षे भाजपने प्रभू श्रीरामाचंद्रांच्या नावावर राजकारण केले, हे अख्ख्या जगाने पाहिले. पण श्रीराम कोणाच्या सातबार्‍यावर नाही. राम मंदिराचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपने रामाच्या नावाने राजकारण करु...

सिडकोतील सिंहस्थ नगर येथील मनपाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे रविवारी (ता. 2) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी पत्रकारांनी राम मंदिराचा मुद्दा छेडला असता त्यांनी भाजपला टोला लगावला. कोरोनामुक्त भारत व महाराष्ट्र घडो हिच श्रीराम चरणी प्रार्थना आहे. प्रभू श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही. तो सातबारा कोणाच्या मालकीचा देखील नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी. गेल्या ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं आहे. रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे - जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं. प्रामाणिकपणा व मर्यादा हे प्रभु रामाचे गुण घ्यावे असेही त्यावेळी ते म्हणाले.

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ