VIDEO : भल्या पहाटे हॉस्पीटलमध्ये अवतरला आगंतुक पाहुणा..! नागरिकांची मात्र चांगलीच पाचावरण धारण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

शनिवारी (ता.३०) सकाळी साडेतीन वाजता याच मार्गावरील सुयश हॉस्पििटलमध्ये शिरला. दरम्यान, दोन दिवसांपासून शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या त्याच्या संचारामुळे नागरिकांची मात्र चांगलीच पाचावरण धारण बसली आहे.

नाशिक : शहरातील बीवायके कॉलेज परिसरात बिबट्या दिसल्याची घटना ताजी असतानाच बिबट्या (ता.३०) सकाळी साडेतीन वाजता याच मार्गावरील सुयश हॉस्पििटलमध्ये शिरला. दरम्यान, दोन दिवसांपासून शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांची मात्र चांगलीच पाचावरण धारण बसली आहे.

आधीच सूचना दिल्याने सतर्क

कॉलेजरोडच्या घटनेनंतर शनिवारी (दि.३०) मध्यरात्री चांडक सर्कल भागातील हॉटेल एसएसकेच्या रेस्टॉरंटमध्ये पहाटे दीड वाजेच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. रेस्टॉरंटमध्ये शिरलेला बिबट्या काही वेळ थांबून हा बिबट्या आल्या मार्गाने मुंबई नाक्याच्या दिशेने निघून गेला. सीसीटीव्ही फूटेजमध्येही तसे दिसून आले. या घटनेनंतर दीड तासांच्या अंतराने सकाळी साडेतीन वाजता हाच बिबट्या सुयश हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये शिरला. येथील व्यवस्थापनाला पोलिसांनी या भागात बिबट्या असल्याबाबत आधीच सूचना दिली असल्याने सुरक्षा रक्षक त्यादृष्टीने सतर्क होते. बिबट्या आल्याचे सुरक्षा रक्षकांनीही पाहिले. 

नाशिक शहरात अलीकडेच बिबट्याचा वावर

नाशिक शहरात अलीकडेच बिबट्याचा वावर वाढला आहे. आजपर्यंत बिबट्याचे नाशिक परिसरात 20 ते 25 हल्ले झाले आहेत. गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथील भरवस्तीत धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला तेथील नागरिक आणि वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर पकडण्यात यश आले.या बिबट्याला जेरबंद करण्यापूर्वी खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार, कॅमेरामन, वनरक्षक, नगरसेवक त्याच्या हल्ल्यात जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील ग्रामीण भागांबरोबरच वेगवेगळ्या शहरांमध्ये भरवस्तीत बिबट्यांचे नागरिकांवर होत असलेले हल्ले वाढत चालले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

वनसंरक्षण विभागापुढे मोठे आव्हान

मानवी वस्तीमध्ये सर्रास आणि राजरोसपणे येणार्‍या बिबट्यांनी राज्याच्या वनसंरक्षण विभागापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्याचबरोबर गावागावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांच्या विहिरीत पडून मृत्यू होण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. सध्या ऊसतोडणी झाल्यामुळे बरेचसे शेती क्षेत्र उजाड झाले आहे. दुसरीकडे, जंगलातील वनक्षेत्र कमी होत असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी कुठेही आडोसा राहिलेला नाही. यामुळेच  बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढल्याचे दिसत आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

बीवायके ते इंदिरानगरचा प्रवास
शुक्रवारी (ता.२९) सकाळी १० वाजेच्या सुमारास कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोल पंप व बीवायके परिसरात दिसलेला बिबट्याच पुढे तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राकडून हॉटेल एसएसके, सुयश हॉस्पिटलकडून इंदिरानगरच्या दिशेने गेल्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard at hospital nashik marathi news