भऊरला बिबट्याकडून पाच शेळ्या फस्त; शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

मोठाभाऊ पगार
Friday, 9 October 2020

पवार पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले, तेव्हा त्यांना शेडमधील पाच शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्का बसला. परिसरात राहणाऱ्या पशुपालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भऊर (जि.नाशिक) : पवार पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले, तेव्हा त्यांना शेडमधील पाच शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्का बसला. परिसरात राहणाऱ्या पशुपालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. काय घडले नेमके?

पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्या

रामनगर शिवारात बुधवारी (ता. ७) रात्री बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करत पाच शेळ्या फस्त केल्या. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तत्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. भऊर (ता. देवळा) येथील रामनगर शिवारातील प्रकाश पवार यांनी आपल्या घराजवळील शेडमध्ये शेळ्या बांधल्या होत्या. पवार पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले, तेव्हा त्यांना शेडमधील पाच शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. वनरक्षक शांताराम आहेर, वनपाल राकेश आहेर, गवळी, तलाठी नितीन धोंडगे, कोतवाल जिभाऊ गरुड, पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला. सरपंच दादा मोरे, पोलिसपाटील भरत पवार, देवळा कृषी बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, पंडित पवार, शैलेश पवार, विजय पवार, दीपक पवार, शशी पवार, नितीन पवार, राजेंद्र पवार, जितेंद्र पवार आदी परिसरात राहणाऱ्या पशुपालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

वन विभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रकाश पवार यांच्या पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, भरपाई मिळावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संपादन -ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard killed five goats at bhaur nashik marathi news