VIDEO : "आता घराबाहेर पडून दाखवा? शहरात साक्षात तुमचा काळ फिरतोय.."

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 30 मे 2020

 "बाबांनो कोरोनामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, घराबाहेर पडू नका असे आवाहन पोलिस नागरिकांना रोज करीत आहेत. तरीही नागरिक मात्र सुधारत नाहीत. पण आता तर साक्षात तुमचा काळ शहरात फिरू लागलाय..इथेही गंभीरतेने घेतले नाही तर जीवानिशी जाल...कारण एकदा का तुम्ही त्याच्या तावडीत सापडलात तर तुमची सुटका नाहीच..आता बाहेर पडून दाखवा..कारण तो शिकारच्या शोधात फिरतोय.." जंगलातून शहरी भागात शिरून जणू काही तो सुध्दा इशारा देतोय...घरी राहा नाहीतर जीवानिशी जाल..

नाशिक : "बाबांनो कोरोनामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, घराबाहेर पडू नका असे आवाहन पोलिस नागरिकांना रोज करीत आहेत. तरीही नागरिक मात्र सुधारत नाहीत. पण आता तर साक्षात तुमचा काळ शहरात फिरू लागलाय..इथेही गंभीरतेने घेतले नाही तर जीवानिशी जाल...कारण एकदा का तुम्ही त्याच्या तावडीत सापडलात तर तुमची सुटका नाहीच..आता बाहेर पडून दाखवा..कारण तो शिकारच्या शोधात फिरतोय.."
 

जणू काही तो सुध्दा इशारा देतोय...घरी राहा नाहीतर जीवानिशी जाल..

शहरातील कोरोना संसर्ग त्यामुळे होणाऱ्या झपाट्याने मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून संचारबंदी अधिक कडक झाली आहे. तरीही त्यास न जुमानता पोलिस पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी दररोज हजारो लोक मॉर्निंग वॉकसाठी, किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध "ऑपरेशन ऑल आउट' राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पण आता साक्षात म्हणजेच  जंगलात राहणाऱ्या बिबट्याचाच शहरी भागातील वावर वाढू लागलाय. त्यामुळे सर्वांसमोर आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे घराबाहेर पडाल..तर एकतर कोरोनाचे अगोदरच सावट आहेच. पण आता बिबट्याही फिरू लागलाय. जणू काही तो सुध्दा तुम्हाला सांगतोय..घरी राहा नाहीतर जीवानिशी जाल..

इंदिरानगर - बिबट्या सीसीटिव्हीत कैद..दोघे जखमी

इंदिरानगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटीमध्ये आज (दि.३०) पहाटे बिबट्याने शिरकाव करत दोघांना जखमी केले आहे. ही बाब पोलीस व वन विभागास समजताच घटनास्थळी पोलीस व वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. बिबट्या इंदिरानगरमध्ये आल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजली असून सर्वांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीतील बी १२ मध्ये बिबट्या कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या सोसायतील बिबट्याने दोन जणांना जखमी केले आहे. इंदिरानगर परिसरात बिबट्या आल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांना मिळाली. ते पोलीस कर्मचारी व वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून त्याला पकडण्यासाठी धावपळ सुरु झाली. परिसरात पथकास बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॉलेजरोड सारख्या वर्दळीच्या भागात बिबट्या शिरलाच कसा?

वर्दळीचे ठिकाण असलेल्या कॉलेज रोड परिसरात महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी शुक्रवारी (ता. 29) सकाळी नऊच्या सुमारास शहरात वाणव्यासारखी पसरली; परंतु जखमी महिलेसह अन्य कुठल्याही व्यक्‍तीने बिबट्याला पाहिले नाही. वन विभागाने पोलिस दलाच्या मदतीसह संपूर्ण परिसर पिंजून काढला. दुसरीकडे शहरात अफवांना ऊत आला होता. ठोस पुरावे न आढळल्याने बिबट्या नसल्याच्या निष्कर्षाप्रत वन विभाग पोचला होता. पण दुसऱ्याच दिवशी इंदिरानगर मध्ये बिबट्याने हल्ला केला.. त्यामुळे एक गोष्ट तर निश्चित झाली. की बिबट्याचा शहरी भागात आता वावर होऊ लागलेला आहे

ग्रामीण भागातील नुकतीच घटना..

वडगाव पिंगळा (सिन्नर) येथील शेडनेटमधील शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी सकाळी शेतमालक गेले असता धक्कादायक प्रकार घडला. शेडनेटचे दार उघडताच त्याचे झाले दर्शन अन् त्याला समोर बघून त्या शेतमालकाची भंबेरीच उडाली...शेडनेटचे दार बंद करत त्यांनी बाहेर धाव घेतली. ही बाब वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले.. शेडनेटचे गेट उघडे राहिल्याने बिबट्या आत गेला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण

पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्याचे पाच ते दहा किलोमीटरच्या परिसरात स्वतःचे स्वतंत्र कार्यक्षेत्र असते. मात्र, बिबट्यांची संख्या वाढल्यावर त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारू शकते. मानवाने अमर्याद जंगलतोड करून बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केले आहे. विकासाच्या नावाखाली जंगलावर अतिक्रमण केले जात आहे. जंगल परिसरात माणसांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बिबट्या गर्दीपासून दूर जाण्याऐवजी आणखी जवळ येऊ लागला आहे.

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror in nashik city marathi news