तीन चिमुकले..अन् एका वृद्धास ठार मारणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद..!

leopard.jpg
leopard.jpg

नाशिक : बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण होते. यातच दोन महिन्यात दोनवाडे, हिंगणवेडे आणि बाभळेश्‍वर याठिकाणी बिबट्यांनी हल्ला करत तीन चिमुकले आणि एका वृद्धास ठार मारले होते. तसेच काही गंभीर जखमी देखील केले होते.​

नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्‍वास

 तालुक्‍यातील दारणाकाठी असलेल्या जाखोरी येथे गुरुवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. तब्बल दीड ते दोन महिन्यापासून तालुक्‍यातील दारणे लगतच्या गावांमध्ये बिबट्या दहशत पसरवली होती. आज बिबट्या जेरबंद झाल्याने बिबट्याची दहशत कमी होण्याची शक्‍यता आहे. गुरूवारी रात्री (ता.2) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच, मध्यरात्री उशिरा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहचत पुढील कारवाई केली.परिसरात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

अनेकांना केले ठार व जखमी 

तालुक्‍यातील दोनवाडे-वंजारवाडी भगूर पासून तर शिंदे, पळसे, जाखोरी, बाभळेश्‍वर, कोटमगाव, हिंगणवेढे पर्यत बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण होते. यातच दोन महिन्यात दोनवाडे, हिंगणवेडे आणि बाभळेश्‍वर याठिकाणी बिबट्यांनी हल्ला करत तीन चिमुकले आणि एका वृद्धास ठार मारले होते. तसेच काही गंभीर जखमी देखील केले होते.

नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद..!

गेल्या चार दिवसात सामनगाव आणि कोटमगाव या ठिकाणी 14 वर्षीय आणि चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला देखील केला होता. यात 14 वर्षीय युवक बालंबाल बचाविला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे परिसरातील बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनामधून जोर धरत होती. यातच या नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची मागणी देखील लोकप्रतिनिधींनी केली होती.

गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप अन्‌ भीतीचे वातावरण होते

या भागातील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप अन्‌ भीतीचे वातावरण यामुळे वनविभागामार्फेत याठिकाणी बिबट्यास जेरबंद करण्याकरीता प्रयत्न करत होती. त्याकरीता परिसरात बिबट्याच्या मागावर 10 ते 15 पिंजरे, ट्रॅप कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी येथील शेतकरी बबलू सय्यद यांच्या गट क्रमांक 285 मध्ये वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, प्रवीण राठोड, यांनी बिबट्याच्या मागावरून पिंजरा बसविला होता. गुरूवारी रात्री या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com