सामनगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

सामनगावात बाभळीच्या वृक्षांच्या मध्यभागी लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला. सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या ओम विष्णू कडभाने (४) या चिमुकल्यावर बिबट्याने रविवार (ता. २८) रोजी हल्ला केला होता.

नाशिक : (नाशिकरोड) पुर्व भागात गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सामनगाव शिवारातील प्रेस कामगार सुभाष ढोकणे यांच्या मळयात पिंजरा लावण्यात आला होता त्यात रविवारी (ता.12) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला.

पहाटे भक्ष्याच्या शोधात फिरत असतांनाच...

सामनगावात बाभळीच्या वृक्षांच्या मध्यभागी लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला. सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या ओम विष्णू कडभाने (४) या चिमुकल्यावर बिबट्याने रविवार (ता. २८) रोजी हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यात ओमचे प्राण वाचले. या पाटील मळ्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बळवंत मुरलीधर जगताप यांच्या गट क्रमांक-८१लगत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या रविवारी (ता.12) मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात अडकला. नाशिक तालुक्यात बिबट्याच्या हल्लात चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर तीन जण जखमी झाले आहे. 

हेही वाचा > भरदुपारी चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; परिसरात खळबळ

दहा दिवसांत दुसरा बिबट्या पिंजऱ्यात

पिंजऱ्यात बिबट्या गुरगुरूत डरकाळ्या फोडू लागल्याने सकाळी शेतावर जाण्यासाठी निघालेल्या गावकऱ्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. पिंजऱ्यात बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, विजय पाटील यांचे पथक तत्काळ सामनगावात पोहचले. काही वेळेतच नाशिक पश्चिम वनविभागाचे वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह चालक प्रवीण राठोड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा तत्काळ घटनास्थळावरून वाहनाद्वारे वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या हलविला. बिबट्या सुस्थितीत असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards were kept in cages in Samangaon Shivara nashik marathi news