
नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना सोमवारी (ता. २१) मोबाईलवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा मेसेज आला. त्यात म्हटले होते, की,केंद्राने केलेले कृषी कायदे कसे फायद्याचे आहे हे तुम्हाला पत्राद्वारे समजून सांगत आहे. सदरचे पत्र संजय साठे यांनी डाउनलोड केले. त्यावेळी त्यांचा संताप झाला..कारण....
निफाड (जि.नाशिक) : शेतकरी संजय साठे यांना मोबाईलवर केंद्रीय कृषिमंत्री यांचा मेसेज आला. त्यात म्हटले होते, की,केंद्राने केलेले कृषी कायदे कसे फायद्याचे आहे हे तुम्हाला पत्राद्वारे समजून सांगत आहे. ते पत्र संजय साठे यांनी डाउनलोड केले. त्यावेळी त्यांचा संताप झाला..कारण....
पत्राला घरातल्या चुलीत जाळून होळी
नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना सोमवारी (ता. २१) मोबाईलवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा मेसेज आला. त्यात म्हटले होते, की,केंद्राने केलेले कृषी कायदे कसे फायद्याचे आहे हे तुम्हाला पत्राद्वारे समजून सांगत आहे. सदरचे पत्र संजय साठे यांनी डाउनलोड केले. ते पत्र त्यांनी वाचले असता, त्यात कृषिमंत्री तोमर यांनी म्हटले आहे, की मी हाडाचा शेतकरी आहे. ते जर हाडाचे शेतकरी असते तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कडाक्याच्या थंडीत गार पाण्याचे फवारे मारले नसते. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या नसत्या.
संतप्त भावना
२६ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच कांद्याची बंद निर्यात खुली व्हावी या उद्देशाने नैताळे (ता. निफाड) येथील शेतकरी संजय साठे यांनी त्यांना आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पत्राला घरातल्या चुलीत जाळून होळी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट
ते जर हाडाचे शेतकरी असते तर....
आज आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. ३४ शेतकरी शहीद झाले आहेत, हे झाले नसते. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत, तुमचे धोरण शेतकऱ्यांना नुकसानीत भर टाकणारे आहे. तसेच कांदा आयातीसाठी ३१ जानेवारीपर्यंत सवलत दिल्याने आता कांदा किमान ३१ जानेवारीपर्यंत निर्यात होणार नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या धोरणांना विरोध करत कांदा निर्यातबंदी खुली व्हावी, तसेच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या हेतूने तुम्ही पाठवलेल्या पत्राची आमच्या कौटुंबिक पारंपरिक चुलीमध्ये होळी करून तुमच्या धोरणांचा निषेध करत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली.
हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर
-