esakal | वाहतूकीचे नियम मोडले, मग काय आता हे तर होणारच होतं!
sakal

बोलून बातमी शोधा

nashik pune highway.jpg

वाहतूक पोलिस शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे बेशिस्‍त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. प्रसंगी दंडात्‍मक कारवाई केली जाते. रस्‍ता सुरक्षेच्‍या दृष्टीने सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्देशाने समिटी ऑन रोड ट्रान्‍सपोर्ट (सीओआरएस) यांनी केलेल्‍या सूचनानुसार विविध कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूकीचे नियम मोडले, मग काय आता हे तर होणारच होतं!

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : वाहतूक पोलिस शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे बेशिस्‍त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. प्रसंगी दंडात्‍मक कारवाई केली जाते. रस्‍ता सुरक्षेच्‍या दृष्टीने सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्देशाने समिटी ऑन रोड ट्रान्‍सपोर्ट (सीओआरएस) यांनी केलेल्‍या सूचनानुसार विविध कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

परवाने रद्द; प्रादेशिक परिवहन कार्यालयातून माहिती
(सीओआरएस) या समितीकडे बेशिस्‍त वाहनचालकांचे लायसन्‍स निलंबित करण्यासाठी निलंबन प्रस्ताव प्राप्त होतात. गेल्‍या नऊ महिन्‍यांत ११८ वाहनचालकांचे परवाने तीन महिन्‍यांसाठी रद्द केल्‍याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली. विविध पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही कारवाई केल्‍याचे प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्‍त वाहनचालकांना दंडात्‍मक कारवाईला सामोरे जाताना अनेक वेळा बघायला मिळते. गेल्‍या नऊ महिन्‍यांत नाशिकमध्ये वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या ११८ चालकांचे लायसन्‍स तीन महिन्‍यांसाठी निलंबित केले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळाली. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

...अशी झाली कारवाई 
गेल्‍या १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान ६९८ बेशिस्‍त वाहनचालकांचे लायसन्‍स निलंबित केले आहे, तर १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० अशा नऊ महिन्‍यांच्‍या कालावधीत ११८ चालकांचे लायसन्‍स ९० दिवसांसाठी निलंबित केले आहेत. या कालावधीत संबंधित वाहनचालकांना वाहन चालविता येणार नाही. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


...या कारणांमुळे होऊ शकते लायसन्‍स निलंबित 
-निर्धारित वेगमर्यादेपेक्षा जास्‍त वेगाने वाहन चालविणे 
- लाल सिग्‍नल ओलांडून जाणे 
- मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे 
- मद्यप्राशन, अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे 
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर 
 

बेशिस्‍त वाहनचालकांचे लायसन्‍स निलंबनाची कारवाई केली जाते. तरीही संबंधित वाहनचालकात सुधारणा झाली नाही व पुन्‍हा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कायमस्‍वरूपी लायसन्‍स निलंबित होऊ शकते. तरी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. 
-विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी