दृष्टिबाधित सागरकडून दुर्गम लिंगाणा दुर्ग सर! सलग तिसरा विक्रम

युनूस शेख
Friday, 19 February 2021

रायलिंग पठार, रायगड, तोरणा, लांबवर दिसणारा राजगड, काळ नदीचे खोरे, आशा एकेक गोष्टी सागरला सांगत गेले. त्याप्रमाणे अंदाज बांधून टीमच्या सहकार्याने त्यांनी अडचणीवर मात करून सुरक्षित सर्वसह सायंकाळी सातला लिंगाण्याच्या पायथ्याशी पोचले.

नाशिक : गरुडझेप प्रतिष्ठानमधील दिव्यांग सागर बोडके याने रविवारी (ता.१४) दुर्गम लिंगाणा दुर्ग सर करत सलग तिसरा विक्रम रचला. २०१९ मध्ये २१ वेळा महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, तर २०२० मध्ये वझीरसुळका शिखर सर करून विश्‍वविक्रम केला होता. 

सलग तिसरा विक्रम
सागरसह १६ गिर्यारोहक आणि तीन टेक्निकल स्वयंसेवक उपस्थित होते. गिर्यारोहण आणि क्लाईमिंगची इक्विपमेंट जुळवाजुळव केली. रोप फिक्स करून क्लायबिंगला सुरवात केली. डॉ. दत्तात्रय रोकडे सागरला आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होते. रायलिंग पठार, रायगड, तोरणा, लांबवर दिसणारा राजगड, काळ नदीचे खोरे, आशा एकेक गोष्टी सागरला सांगत गेले. त्याप्रमाणे अंदाज बांधून टीमच्या सहकार्याने त्यांनी अडचणीवर मात करून सुरक्षित सर्वसह सायंकाळी सातला लिंगाण्याच्या पायथ्याशी पोचले. विविध आव्हानास तोंड देत रात्री साडेनऊच्या सुमारास लिंगाणा सर करत तिरंगा फडकविला.

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

आतापर्यंत १५ जागतिक विक्रम

गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांचे मार्गदर्शनही सागरला लाभले. लिंगाणा डोंगरी किल्ला शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये बांधला. रायगडच्या उपदुर्ग घाटावर पहारेसाठी, महाडपासून ईशान्येला ४५ मैलावर पाने गावाजवळ आहे. त्यावरील गुहेचा वरील आकार शिवलिंगासारखा आहे. तोरणा व रायगड यांच्यादरम्यान तो आहे. पायथ्यापासून अर्ध्या तासात अवघड वाटेने गुहेजवळ जाता येते. गरुडझेप संस्थेकडचे विविध प्रकारांत आतापर्यंत १५ जागतिक विक्रम झाले.  

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lingana fort from climbed impaired sagar nashik marathi news