लॉकडाउनमुळे ‘आरटीओ’ला कोट्यावधींचा फटका; गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट

योगेश मोरे 
Friday, 14 August 2020

एप्रिल ते जुलै २०२० पर्यंत आठ हजार वाहन नोंदणी झाली आहे. यातून २६ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. ​

नाशिक / म्हसरूळ ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन अन्‌ लॉकडाउनचा सर्वच संस्थांना फटका बसला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) महसुलात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ४६ कोटी रुपयांची घट झाली आहे. एप्रिल ते जुलै २०२० पर्यंत आठ हजार वाहन नोंदणी झाली आहे. यातून २६ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन नोंदणी, चारचाकी व वाहतूक वाहन परवाना नूतनीकरण, आकर्षक क्रमांक, कच्चा परवाना, पक्का परवाना, वाहन हस्तांतरण, फ्लाइग स्कॉड आदी माध्यमातून महसूल जमा होतो. यात सर्वाधिक महसूल नवीन वाहन नोंदणीतून जमा होतो. गतवर्षी नवीन दुचाकी, चारचाकी, ट्रान्स्पोर्ट वाहन एप्रिल ते जुलैदरम्यान जवळपास २९ हजार वाहनांच्या नोंदणी झाल्या होत्या. यातून ७२ कोटींचा महसूल जमा झाला होता. या वर्षी अनेक उद्योगधंद्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयही त्याला अपवाद नाही. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा

कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. या काळात लॉकडाउन सुरू असल्याने बरेच उद्योगधंदे बंद होते. लॉकडाउन शिथिल होताच वाहन नोंदणीत वाढ होत आहे. भविष्यात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या काळात वाहन खरेदी वाढून महसुलात वाढ होईल. 
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक 
 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन- मनीष कुलकर्णी 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown hits Rs 46 crore to RTO nashik marathi news