आश्चर्यच! लॉकडाऊनमध्ये दाम्पत्यांना लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!

three babies 1.jpg
three babies 1.jpg
Updated on

नाशिक / सातपूर : लॉकडाऊन, कोरोनाचे गंभीर संकट अशा काळात काय करायचे.हा देखील प्रश्न सर्वांसमोर उभा होता.त्यांनी यावर उपाय काढलाच. सोशल ड्स्टिन्सिंग पाळले.  हॉस्पिटलमध्ये फक्त बाळाची आजी आणि वडिल यांनाच प्रवेश देण्यात आला. हॉस्पिटलचा स्टाफही मोजकाच उपस्थित होता.डॉ. निकम यांनी मोठ्या प्रयासाने आई आणि बाळांना सर्वच संकटांपासून दूर ठेवले.

लॉकडाऊनमध्ये तिघांचे वेलकम

सातपूरच्या नवजिवन हॉस्पिटलमध्ये बोरसे दाम्पत्याच्या पोटी तिळे जन्माला आले. आईच्या गर्भात एकत्रच नऊ महिने वाढलेल्या तीन जिवांना या जगात आल्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग आणि जगात चालत असलेल्या कोरोनाच्या भयावह संकटाचा सामना करावा लागला. तिन्ही बालके आणि आई वेदिका सध्या सुखरुप आहे. त्यासाठी मेहनत घेतली ती डॉ.स्नेहल निकम व या बाळांचे वडिल कुणाल बोरसे यांनीही..

महिनाभरापासूनच काळजी घ्यायला सुरूवात

लॉकडाऊनच्या या काळात गर्भवती असलेल्या अनेक महिलांची फरफट होत होती.पण गेल्या महिनाभरापासून कुणाल बोरसे यांनी पत्नी वेदिका यांची काळजी घ्यायला सुरूवात केली. या काळात त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला माहिती देत सर्वप्रथम पासेस मिळवले. डॉक्टरांच्या ओपीडीत गर्दी नसताना पत्नीला तपासणीसाठी नेणे किंवा डॉक्टरांशी फोनवर बोलून उपचार घेणे, असे मार्ग अवलंबले. वेदिका यांना तिळे आहेत हे सहाव्या महिन्यातच कळले होते. त्यामुळे काळजी वाढली होती. त्यातच लॉकडाऊन, कोरोनाचे गंभीर संकट अशा काळात काय करायचे.हा देखील प्रश्न सर्वांसमोर उभा होता.
त्यांनी यावर उपाय काढलाच. सोशल ड्स्टिन्सिंग पाळले.  हॉस्पिटलमध्ये फक्त बाळाची आजी आणि वडिल यांनाच प्रवेश देण्यात आला. हॉस्पिटलचा स्टाफही मोजकाच उपस्थित होता.डॉ. निकम यांनी मोठ्या प्रयासाने आई आणि बाळांना सर्वच संकटांपासून दूर ठेवले.

आज दोन कन्या आणि एक पुत्ररत्न

गेल्या महिनाभरापासून मी आणि माझा परिवार लॉकडाऊन मध्ये काळजी घेत होतो प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन वेळोवेळी करत होतो त्यातच एका वेळी तीन बाळ जन्माला येणार म्हणून काळजी अधिकच होती. अनेकदा नवजात बाळाला जन्म झाल्यानंतर अनेक अडचणी येतात हे जाणून होतो. तश्या पद्धतीने तयारी देखील करून ठेवली होती. आज दोन कन्या आणि एक पुत्र झाल्याने सर्वांना आनंद आहे -  कुणाल बोरसे 

 बाळांना सुखरुप ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. तिळे असल्याने आणखीच काळजी होती. मात्र आम्ही सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन योग्य प्रकारे केले. बाळांचे वजन देखील प्रत्येकी दोन किलो आहेत. आई आणि बाळ आता पुर्ण सुखरुप आहेत. लॉकडाऊन काळात गेल्या महिनाभरापासूनच आम्ही वेदिकाची काळजी घेत होतो हॉस्पिटलमध्ये जेव्हा कोणी रुग्ण तपासणीसाठी नसतील तेव्हाच आम्ही तपासणीसाठी बोलवत होतो त्यातच कोरोनासारख्या महामारीत सर्वांपुढे आवाहन होतेच पण आम्ही आमच्या अनुभवाच्या जोरावर सर्व काही सुखरूप होऊ दिले याचा आनंद आहे - डाॅ. स्नेहल निकम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com