esakal | "भूखमरी से बेहाल ..दादीमॉं चल बसी दुनिया छोडके" ते हुंदके देत बोलत होते
sakal

बोलून बातमी शोधा

majur nashik.jpg

स्थळ..  विल्होळी..  वेळ.. दुपारची... राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवाहन विभागातर्फे परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे. हे समजल्यावर शर्मा कुटुंब लेकरांबाळांसह गुरुवारी पोचले. त्यांनी ओळखपत्र, आधारकार्ड दाखवून नावनोंदणी करून गावाकडे प्रवास सुरू केला. तत्पूर्वी त्यांच्याशी झालेला हा संवाद... 

"भूखमरी से बेहाल ..दादीमॉं चल बसी दुनिया छोडके" ते हुंदके देत बोलत होते

sakal_logo
By
सोमनाथ कोकरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थळ..  विल्होळी..  वेळ.. दुपारची... राज्य परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवाहन विभागातर्फे परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे. हे समजल्यावर शर्मा कुटुंब लेकरांबाळांसह गुरुवारी पोचले. त्यांनी ओळखपत्र, आधारकार्ड दाखवून नावनोंदणी करून गावाकडे प्रवास सुरू केला. तत्पूर्वी त्यांच्याशी झालेला हा संवाद... 

दादीमॉं चली दुनिया छोडके...

लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून कामबंद, हातात होते तेवढे पैसे खाण्यावर आणि आजीच्या कर्करोगाच्या उपचारावर खर्च झाले. आता वेळ आली उपासमारीची, सुतारकामाचे ठेके घेणारा मित्र विनोद सिंग याच्याकडे पैसे मागितले. मात्र त्याच्याकडूनही पैसे न मिळाल्याने, सहा दिवसांपूर्वी आजीचे निधन झाले. आमचे सगळेच इथले संपले. लॉकडाउनमुळे नोकरी, पैसे आणि आजी असे सर्वच गमावून गावाकडे निघालेला हताश राजकुमार शर्मा हुंदके देत बोलत होता. 

गावाला जायला दिले नाहीत पैसे 
राजकुमारसोबत चार महिन्यांपूर्वी गावाहून येताना आजी सोबत होती. पण आजी त्याला सोडून जगातून निघून गेलीय. उपचारासाठी आणली अन्‌ पैशाअभावी उपचार करू शकलो नाही, वाचवू शकलो नाही. ही सल आणि दुःखाच्या कोसळलेल्या डोंगराचा भार घेऊन तो गावी निघालाय. देवळाली कॅम्प भागातील विनोद सिंग यांच्याकडे सुतारकाम करणारा बिहारमधील सेमरिया जिल्ह्यातील कारागीर राजकुमार शर्मा आपले सर्व कुटुंब घेऊन गुरुवारी विल्होळी येथे पोचला. पत्नी सीमाकुमारी, दोन महिन्यांचा मुलगा देवराज, दोन वर्षांची कन्या रोशनी, भाऊ कुंदनकुमार, चंदनकुमार, मेहुणा प्रदीपकुमार हे एका टेम्पोतून देवळाली कॅम्पहून विल्होळीला पोचले. त्यांनी सर्वांनी मिळून आजी सुनीतादेवी आजारी असल्याने चार महिन्यांपूर्वी बिहारहून नाशिकला आणले. औषधोपचार सुरू झाला. रोगाचे निदान झाले. कर्करोग आजार ऐकताच सर्व जण घाबरले.

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

पैशांची कमतरता असताना उपचार सुरू झाले. पण लॉकडाउन काळात कामे बंद झाली आणि पैसेही येणे बंद झाले. त्यामुळे औषधोपचार करणे शक्‍य झाले नाही. त्यातच सुनीतादेवी यांचे निधन झाले. ठेकेदाराने गावाला जायलासुद्धा पैसे दिले नाहीत. नोकरी, पैशासोबतच आजी गमावल्याची सल आसवांच्या रूपातून डोळ्यात आणून देताना त्याची आपबीती सगळ्यांनाच अस्वस्थ करीत होती.  

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा