प्रेमविवाह न करताच दाम्पत्य माघारी .. ऐनवेळीच लवगुरुने काढला पळ! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 19 June 2020

नाशिक ः प्रेमविवाहासाठी एका युगुलाने ज्यांनी स्वतः प्रेमविवाह केला आहे, अशा अनुभवी लवगुरुला नियोजनाची मुख्य जबाबदारी दिली खरी; पण ऐनवेळी या अनुभवी लवगुरुनेच घटनास्थळापासून पळ काढल्याने पंचवटीत विवाहाला आलेल्या प्रेमीयुगुलाला प्रेमविवाह न करताच माघारी सातपूरला घरी परतण्याची नामुष्की ओढावली. 

नाशिक : कुटुंबाचा विरोध डावलून प्रेमविवाह करणाऱ्यांना पूर्वानुभव असलेले लव्हगुरू मार्गदर्शक वाटत असतात. पण प्रेमविवाहाच्या ऐन मोक्‍याच्या क्षणी असा मार्गदर्शक गुरूच फरारी झाला तर प्रेमविवाहांसाठी उतावीळ जोडप्याला कशी मनस्तापाची वेळ येऊ शकते, याचे उदाहरण ठरावं, अशी घटना सातपूरला समोर आली. 

प्रेमविवाह न करताच दाम्पत्य माघारी .. ऐनवेळीच लवगुरुने काढला पळ 

महाविद्यालयीन जीवनात प्रेम जुळल्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन अनेकजण जात-पात-धर्मप्रांताची बंधने तोडून अनेक जण प्रेम विवाहाच्या गाठी बांधतात. अशा प्रेमविवाहांची संख्या वाढत आहे. कुटुंबाचा विरोध मोडून काढताना अनेक प्रकारच्या क्‍लुप्त्या लढवितात. पण या सगळ्या प्रेमविवाहाच्या धाडसासाठी अनेक जण शक्‍यतो, पूर्वी प्रेमविवाह केला आहे, अशा अनुभवी जोडप्यांचा सल्ला घेतात.  

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

अगोदर प्रेमीयुगलाला धीर

सातपूरला तुषार नावाच्या एका महाविद्यालयीन युवकाचे त्याच्याच महाविद्यालयातील स्नेहल या मुलीबरोबर प्रेम  जुळले. प्रेमाचे रूपांतर घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोचले. त्यासाठी मित्रमंडळी कामाला लागली. त्यातील एकाने माझा ओळखीचा विकास नावाचा व्यक्ती आहे, त्याने स्वतःच प्रेमविवाह केला असल्याने त्याचा अनुभवही आहे. त्याला बोलावून त्याच्या मार्गदर्शनाखालीच लग्न लावण्याचं सुचवत प्रेमीयुगलाला धीर दिला. ठरल्याप्रमाणे मार्गदर्शक विकासभाऊला बोलवून सगळी परिस्थिती सांगितली व या प्रेमविवाहाची मुख्य सूत्रे त्याच्याकडे दिली.मार्गदर्शक विकासभाऊने पंचवटीत एका विवाह संस्थाशी संपर्क साधला आणि विवाहाची सर्व तयारी करून तारीखही निश्‍चित झाली.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

ऐनवेळी लवगुरुनेच काढला पळ

प्रेमविवाहासाठी एका युगुलाने ज्यांनी स्वतः प्रेमविवाह केला आहे, अशा अनुभवी लवगुरुला नियोजनाची मुख्य जबाबदारी दिली खरी; पण ऐनवेळी या अनुभवी लवगुरुनेच घटनास्थळापासून पळ काढल्याने पंचवटीत विवाहाला आलेल्या प्रेमीयुगुलाला प्रेमविवाह न करताच माघारी सातपूरला घरी परतण्याची नामुष्की ओढावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loveguru disappeared When the couple got married,