प्रेमवीरांना जबरदस्त धोका! मार्गदर्शक "लवगुरु'च ऐनवेळी फरार होतो तेव्हा....

सतिश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

सध्या तरूण मुलामुलीं मध्ये घरच्याचा विरोधात जाऊन लग्न करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. पण हे लग्न लावतांना या मुलांना नको ते करण्याची वेळ येते आणि त्याच्यातुन अनेक मनस्तापालाही सामोरे जावे लागले अशीच काहीशी घटना सातपूर मध्ये समोर आली आहे. ज्यामुळे दोघे प्रेमवीर सदम्यात गेले आहेत.

नाशिक / सातपूर : सध्या तरूण मुलामुलीं मध्ये घरच्याचा विरोधात जाऊन लग्न करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. पण हे लग्न लावतांना या मुलांना नको ते करण्याची वेळ येते आणि त्याच्यातुन अनेक मनस्तापालाही सामोरे जावे लागले अशीच काहीशी घटना सातपूर मध्ये समोर आली आहे. ज्यामुळे दोघे प्रेमवीर सदम्यात गेले आहेत.

असे काय घडले नेमके?

सातपूर मध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे याच कॉलेज जिवनातच एका मुली बरोबर प्रेम जुळले पुढे या प्रेमाचे रूपांतर घरच्यांच्या विरोधात पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मित्र मंडळी कामाला लागली त्यातील एकाने माझा ओळखीचा विकास नावाचा व्यकी आहे त्याने स्वताच प्रेम विवाह केला आसल्याने त्याचा दांडगा अनुभवही आहे. त्याला बोलावून त्याचा मार्गदर्शनाखालीच लग्न लावण्याच सांगताच या नव प्रेम विरांचा आनंद गगनात मावेना झाला होता. ठरल्याप्रमाणे विकास भाऊला बोलवून सगळी परिस्थिती सांगितली व या प्रेम विवाहाचे मुख्य सुत्र दिली. विकास भाऊने पंचवटीत एका विवाह संस्थाशी संपर्क साधला आणि विवाहची सर्व तयारी करून तारीखही फिक्स केली त्या नुसार हे दोन्ही प्रेमवीर या संस्थेच्या परिसरात दाखल झाले खरे पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे लग्न लावणार होते. ते विकास भाऊच कागदपत्रे घेऊन ऐन वेळी फरार झाल्याने या प्रेम विराना लग्न न करताच माघारी फिरण्याची वेळ आली त्यातच सदरचा प्रकार दोन्ही कुटूंबाना माहित झाल्याने पुढे जे व्हायला नको होते तेच घडले 

विविध प्रकारच्या कुरापत्या

प्रत्येक आई वडील आपल्या भावी पिढीने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटावा अशी भाबडी आशा बाळगून मुला मुलींना पोटाला चिमटा देत उच्च शिक्षणासाठी पैसा पुरवतात. कॉलेजच्या जिवनात घरच्यांच्या विरोधात जावून सध्या मोठ्या प्रमाणावर प्रेम विवाह करण्याच पेवच उठले आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या कुरापत्या या तरूणाकडून शोधल्या जातात आणि लग्न करून पोलिस ठाण्यात येऊन जन्मदात्या आई वडीला पासूनच आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे अशीही तक्रार केली जाते.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

लग्न न करताच घरी परतण्याची नामुष्की

प्रेम प्रकरणातून लग्न लावण्यासाठी या मुलांनी ज्याने पहीले स्वताच लव मॅरेज केलं आहे. अशा अनुभवी व्यक्तीला मुख्य जबाबदारी दिली खरी पण ऐन वेळी हा अनुभवी व्यक्तीनेच घटणास्थळा पासून पळ काढल्याने या लव मॅरेज करणारे मुलांना लग्न न करताच घरी परतण्याचा नामुष्की ओढवली आहे.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lovers got a huge threat from an experienced love marriage person nashik marathi news

टॉपिकस
Topic Tags: