esakal | सैन्यदलात नोकरी लावण्यासाठी घेतले साडेतीन लाख; पोलिसांत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (44).jpg

सैन्यदलात नोकरी देऊन फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशी फसवणूक न होण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देवळा मध्ये अशीच एक घटना घडली आहे.

सैन्यदलात नोकरी लावण्यासाठी घेतले साडेतीन लाख; पोलिसांत गुन्हा दाखल

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : सैन्यदलात नोकरी देऊन फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशी फसवणूक न होण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देवळा मध्ये अशीच एक घटना घडली आहे.

देवळा मध्ये अशीच एक घटना घडली

मेशी येथील अनिल आहिरे या युवकाला तसेच त्याच्या मित्रांना सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने संशयित आरोपी राजू अहिरे व दीपक बागूल (दोघे रा. वाखारी, ता. देवळा) यांनी संगनमताने त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळले. या पैशांचा विनियोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत फिर्यादी अनिल आहिरे यांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. वाय. भवर, सहाय्यक उपनिरीक्षक ए. बी. फसाले तपास करीत आहेत.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

गुन्हा दाखल

सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वाखारी येथील दोघांविरुद्ध देवळा पोलिसांत गुरुवारी (ता. १८) गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ