esakal | ''राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे'' - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal changan.jpg

या दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यात पाण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी गुजरातकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवावे लागेल. महाराष्ट्राच्या हक्काचे हे पाणी राज्यातच रहायला हवे. यावेळी भुजबळ यांनी जिल्ह्याच्या प्रकल्पांबाबत विविध सूचना देखील केल्या.

''राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे'' - छगन भुजबळ

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. 

कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यावर बैठकीत चर्चा

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा जाणीवपूर्वक आढावा घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्याविषयी चर्चा झाली. जिल्ह्यातील लहान प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर यांनी सहभाग घेतला. त्यांनी विविध सूचना केल्या.

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

महाराष्ट्राच्या हक्काचे हे पाणी राज्यातच राहणार

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहान भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे, त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. नाशिक जिल्ह्यासह लगतच्या मराठवाड्यातही पाण्याची गरज आहे. या दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यात पाण्याला प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी गुजरातकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवावे लागेल. महाराष्ट्राच्या हक्काचे हे पाणी राज्यातच रहायला हवे. यावेळी भुजबळ यांनी जिल्ह्याच्या प्रकल्पांबाबत विविध सूचना देखील केल्या.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ