Mission Admission : अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी; जाणून घ्या पर्याय

अरुण मलाणी
Sunday, 13 September 2020

अभियांत्रिकी शाखेतील पदवी शिक्षणाच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षांच्‍या तारखांची घोषणा नुकतीच झाली. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय खुला असतो.

नाशिक : कुठल्‍याही उत्‍पादनाच्‍या निर्मितीप्रक्रियेत अभियंत्‍यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्‍यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व आजही टिकून आहे. यापूर्वी प्रचलित असलेल्‍या सिव्हिल, मॅकेनिकल, कॉम्प्युटर अशा शाखांसोबत आधुनिक काळाची गरज म्‍हणून ऑरॉनॉटिक्‍स, एअरोस्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स अशा शाखांमध्येही अभियांत्रिकी शिक्षणाचे दालन खुले झाले आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपली कल्‍पकता व कुशलता दाखविण्यासाठी पुरेपूर वाव आहे. 

अभियांत्रिकी शाखेतील पदवी शिक्षणाच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षांच्‍या तारखांची घोषणा नुकतीच झाली. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय खुला असतो. सोबत काही अटींची पूर्तता केलेली असणे आवश्‍यक असते. सीईटी परीक्षांच्‍या गुणांवर शाखानिहाय प्रवेश दिला जातो. त्‍यासाठी निकाल जाहीर झाल्‍यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया पार पडणार आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

अभियांत्रिकीनंतरच्‍या संधी 

अभियांत्रिकी शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना स्‍वतः प्रकल्‍प साकारायचे असतात. यामुळे त्‍यांना प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होत असते. यातून विद्यार्थ्यांना स्‍वतःचे स्‍टार्टअप उभारण्याची संधी असते. शिक्षण घेतलेल्‍या शाखेशी निगडित व्यवसाय, उद्योग करता येतो. बहुराष्ट्रीय, स्‍थानिक एमआयडीसी, बांधकाम व्‍यावसायिक यांच्‍याकडे नोकरीची संधी असते. काही शाखांतून शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना परदेशातही चांगल्‍या संधी उपलब्‍ध आहेत. एमपीएससीमार्फत अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जात असते. या माध्यमातून शासकीय सेवेतही नोकरी करता येते. 

या शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी 

इलेक्ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी, प्रोडक्‍शन, एअरोस्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजेन्‍स अँन्ड डाटा सायन्‍स, ऑटोमेशन अँन्ड रोबोटिक्‍स, इंट्रुमेंटेशन अँन्ड कंट्रोल, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, अॅग्रिकल्‍चरल, ऑटोमोटिव्‍ह, बायोमेडिकल, केमिकल, कॉम्‍प्‍युटर, इलेक्‍ट्रॉनिक्स अँन्ड टेलिकम्युनिकेशन (ई अँन्ड टीसी), ड्राफ्टिंग अँन्ड डिझाइन, मरिन, मॅकेनिकल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बी.टेक. बायोटेक्‍नॉलॉजी आदी शाखांमध्ये शिक्षण घेता येऊ शकते. पदवीनंतर पदव्‍युत्तर पदवीचा पर्याय उपलब्‍ध असतो. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीनंतर एमबीए या व्‍यवस्‍थापनशास्‍त्राचे शिक्षण घेतात. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

आकडे बोलतात... 
नाशिक जिल्हा १९ 
अभियांत्रिकी महाविद्यालये सात हजार ६०६ 
उपलब्‍ध जागा ५५३७६ 

अभियांत्रिकी शिक्षणातून कल्‍पकतेच्‍या क्षेत्रात करिअर घडविता येऊ शकते. सध्याच्‍या कोरोनाच्‍या परिस्थितीत नवनिर्मितीला भरपूर वाव असून, विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाचा फायदा करून घ्यावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲन्ड डाटा सायन्‍स या नव्‍याने उपलब्‍ध शाखेलाही विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. 
- डॉ. गजानन खराटे, प्राचार्य 
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय

संपादन- रोहित कणसे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make a great career in engineering field nashik marathi news