Mission Admission : युपीएससीतून केंद्रीय स्तरावर प्रशासकीय सेवेची संधी; जाणून घ्या पर्याय

अरुण मलाणी
Tuesday, 15 September 2020

केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय राजस्‍व सेवा (आयआरएस), भारतीय वन सेवा (आयएफओएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) यांसह विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. तसेच युपीएससीतर्फे भारतीय रेल्‍वे सेवा, भारतीय व्‍यापार सेवा, भारतीय टपाल सेवा अशा चोवीस प्रकारच्‍या पदांची निवड केली जाते.

नाशिक : राज्‍यस्‍तरीय सेवांप्रमाणे राष्ट्रीय स्‍तरावरील प्रशासकीय पदांसाठी स्‍पर्धा परीक्षांतून उमेदवारांची निवड केली जाते. केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे अखिल भारतीय सेवा पदांची भरती करण्यासह एनडीए व अन्‍य विविध खात्‍यांतील पदांची भरती केली जाते. प्रयत्‍नांच्‍या मर्यादित संधींमुळे सखोल अभ्यासातून परीक्षांना सामोरे जाणे महत्त्वाचे ठरते. युपीएससीच्‍या माध्यमातून केंद्रीय स्‍तरावर प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग खुला आहे. 

विविध पदांसाठी उमेदवारांची निवड

केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय राजस्‍व सेवा (आयआरएस), भारतीय वन सेवा (आयएफओएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) यांसह विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. तसेच युपीएससीतर्फे भारतीय रेल्‍वे सेवा, भारतीय व्‍यापार सेवा, भारतीय टपाल सेवा अशा चोवीस प्रकारच्‍या पदांची निवड केली जाते. राज्‍यस्‍तरीय परीक्षेपेक्षा राष्ट्रीय स्‍तरावरील या परीक्षेचे स्‍वरूप काहीसे वेगळे असते. यात पूर्व परीक्षा वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरूपाची असते. तर मुख्य परीक्षेत विश्‍लेषणात्‍मक प्रश्‍नांवर आधारलेली असते. या दोन्‍ही स्‍तरांवर यश मिळविलेल्या उमेदवारांची व्यक्‍तिमत्त्व चाचणी (मुलाखत) घेतली जाऊन, याद्वारे अंतीम निवड केली जाते. अभ्यासक्रमातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील शिक्षणक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे. यात प्राचीन, मध्ययुगीन भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, देशाची संस्‍कृती, परंपरा, भारताचा भुगोल, जगाचा भुगोल, भारतीय अर्थव्‍यवस्‍था, राज्‍यघटना, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध, पर्यावरण आदी विषयांवर आधारीत प्रश्‍न विचारले जातात. सिसॅटद्वारे नागरी सेवा अभियोग्‍यता चाचणी घेतली जाते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

वय आणि प्रयत्नांची मर्यादा 

युपीएससी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारांचे पदवी शिक्षण झालेले असावे. तसेच वयाची किमान मर्यादा २१ वर्ष तर खुल्‍या प्रवर्गासाठीची कमाल मर्यादा ३२ वर्षे असून, अशा उमेदवारांना सहा प्रयत्‍नांची संधी असते. इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ असून नऊ प्रयत्‍नांची संधी असते. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांना वयाच्‍या ३७ व्‍या वर्षांपर्यंत वयोमर्यादा असून, प्रयत्‍नांचे बंधन नसते. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

युपीएससी परीक्षांना सामोरे जाणाऱ्या मराठी उमेदवारांचे प्रमाण वाढत असले तरी, केंद्रिय स्‍तरावर आपले कौशल्‍य दाखविण्याची उमेदवारांना संधी असते. इंग्रजी विषयातच परीक्षा द्यायची असते असा ग्रह करून घ्यायला नको. प्रादेशिक भाषेतून परीक्षा, मुलाखत देण्याची संधी असल्‍याने अधिकाधिक उमेदवारांनी परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. 
-प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्‍हर्सल फाउंडेशन.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make a great career in upsc nashik marathi news