मालेगावची कोरोनाची रूग्‍णसंख्या कमी; पण मृत्‍यूदर झाला 'इतके' टक्के

अरुण मलाणी
Wednesday, 9 September 2020

गेल्‍या काही दिवसांत पुन्‍हा एकदा मालेगावमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, मध्यंतरीच्‍या काळात नवीन रूग्‍णांचे प्रमाण नगन्‍य झाले होते. दरम्यान मृत्‍यू दराच्‍या बाबत जिल्‍ह्‍यात मालेगावचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाचा शिरकाव होण्याची सुरवात मालेगावपासून झाली होती. सुरवातीच्‍या काही दिवसांत नव्‍याने आढळणारे कोरोना बाधित  आणि मृत्‍यू झालेले रुग्ण हे याच भागातून समोर येत होते. परंतु प्रशासकीय पातळीवरील प्रयत्‍नांतून मालेगावमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला होता. मात्र गेल्‍या काही दिवसांत पुन्‍हा एकदा मालेगावमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, मध्यंतरीच्‍या काळात नवीन रूग्‍णांचे प्रमाण नगन्‍य झाले होते. दरम्यान मृत्‍यू दराच्‍या बाबत जिल्‍ह्‍यात मालेगावचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे.

मृत्‍यूदरात मालेगावचे प्रमाण अधिक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना राज्‍याच्‍या तुलनेत नाशिक जिल्‍ह्‍याचा मृत्‍यूदर कमी आहे. जिल्‍ह्‍यातील मृतांचा आकडा एक हजाराच्‍या उंबरठ्यावर असतांना, मृत्‍यूदरात मालेगावचे प्रमाण अधिक आहे. मालेगाव महापालिका हद्दीतील मृत्‍यूदर ४.०४ टक्‍के इतका आहे. जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या एकूण बाधितांपैकी ६९ टक्‍के बाधित नाशिक महापालिका हद्दीत आढळले असून, शहराचा मृत्‍यूदर मात्र १.७१ टक्‍के आहे. नाशिकसह अन्‍य पंधरा तालुक्‍यांचा समावेश असलेल्‍या नाशिक ग्रामीणचा मृत्‍यूदर २.५१ टक्‍के इतका आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

६९ टक्‍के रूग्‍ण नाशिक शहरातील

मालेगाव महापालिका हद्दीत मृत्‍यूदर ४.०४ इतका आढळून आला आहे. 
जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांपैकी सुमारे ६९ टक्‍के रूग्‍ण नाशिक शहरातील असले तरी नाशिक महापालिका हद्दीतील मृत्‍यूदर १.७१ इतका आहे. शहरातील मृतांचा आकडा एकूण मृत्‍यूंच्‍या पन्नास टक्‍यांपेक्षा अधिक आहे. असे असले तरी बाधितांचीही मोठी संख्या लक्षात घेता प्रत्‍यक्ष मृत्‍यूदरात शहराचे प्रमाण सर्वात कमी राहिले आहे. नाशिक ग्रामीणमधील मृत्‍यूदर २.५१ टक्‍के असून या परीसरातील एकूण मृतांमध्ये सर्वाधिक १४८ मृत साठ वर्षाच्‍या पुढील आहेत. 

देशाच्‍या तुलनेत अधिक, राज्‍यापेक्षा कमीच 

सार्वजनिक आरोग्‍य विभागाने जारी केलेल्‍या अहवालानुसार भारतातील मृत्‍यूदर १.७० टक्‍के असून, हा देशातील मृत्‍यूदराच्‍या तुलनेत जिल्‍ह्‍यातील दर अधिक आहे. तर राज्‍याचा मृत्‍यूदर २.९० टक्‍के असून, त्‍या तुलनेत जिल्‍ह्‍याचा दर कमी आहे. 

जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधित आणि मृत्‍यूची आकडेवारी (काल, ता.८ पर्यंतची) 
क्षेत्र एकूण बाधितांची संख्या मृत्‍यू 
नाशिक महापालिका हद्द- ३१ हजार ९२१, ५४८ 
मालेगाव महापालिका हद्द- २ हजार ९४३, ११९ 
नाशिक ग्रामीण -८ हजार ०१८, २८२ 
जिल्हा बाह्य - २४६, २४

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malegaoan death rate due to corona increased nashik marathi news