मालेगावच्या उपमहापौरांनाही कोरोनाची लागण..संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन

प्रमोद सावंत 
Monday, 27 July 2020

महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव त्रिभुवन यांच्यासह महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आजच नाशिक येथे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नाशिक / मालेगाव : येथील उपमहापौर नीलेश आहेर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी (ता. २६) त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोना संसर्ग काळातही आहेर सतत कार्यरत होते. दरम्यान, गेल्या आठवडाभरात संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. लक्षणे व त्रास जाणवत असल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आहेर यांनी केले आहे. आहेर यांनी स्वत:ला विलगीकरण करून घेतले आहे. किमान सात दिवस विलगीकरण कक्षात राहणे आवश्‍यक असल्याने ते एका स्वतंत्र बंगल्यात वास्तव्याला गेले आहेत. 

या अधिकाऱ्यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण
महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव त्रिभुवन यांच्यासह महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आजच नाशिक येथे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये आहेर यांना प्रथमच लागण झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. सतत हात स्वच्छ धुवावेत, मास्क, सॅनिटायझर वापरावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Deputy Mayor Nilesh Aher corona virus affected nashik marathi news