esakal | मालेगाव "हॉटस्पॉट' नियंत्रण "मिशन' डॉक्‍टरांचे शीघ्र कृतिदल अन्‌ संस्थांत्मक क्वारंटाइनसह पंचसूत्री कार्यक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope 1.jpg

मालेगावमध्ये खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल, असे स्पष्ट करत टोपे यांनी मालेगावमध्ये खासगी हॉस्पिटल असलेल्या डॉक्‍टरांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांना सरकारतर्फे पीपीई किट पुरवण्यात येईल. खासगी डॉक्‍टरांना समजावून सांगितले जाईल, परंतु त्यांनी न ऐकल्यास वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही टोपे यांनी दिला. 
कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

मालेगाव "हॉटस्पॉट' नियंत्रण "मिशन' डॉक्‍टरांचे शीघ्र कृतिदल अन्‌ संस्थांत्मक क्वारंटाइनसह पंचसूत्री कार्यक्रम 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यामध्ये किलोमीटरमधील लोकसंख्येचे प्रमाण साडेचारशे इतके आहे. मालेगावमध्ये हेच प्रमाण 19 हजार लोकसंख्येचे आहे. "क्‍लोज कॉन्टॅक्‍ट'मुळे होम क्वारंटाइन शक्‍य नसल्याने संस्थात्मक क्वारंटाइनवर भर देण्यात येईल. तसेच निरीक्षणामध्ये तपासणी करून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्यास उपचारासाठी दाखल केले जाईल. पोर्टेबल एक्‍स-रेद्वारे चाचणीत न्यूमोनिया तपासण्यात येईल. औषधे दिली जातील. डॉक्‍टरांच्या शीघ्रकृती दलातर्फे उपचार केले जातील, अशी पंचसूत्री कोरोनाविषयक हॉटस्पॉट नियंत्रणाच्या मिशनमध्ये वापरली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

राजेश टोपे : खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल,
मालेगावमध्ये खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल, असे स्पष्ट करत टोपे यांनी मालेगावमध्ये खासगी हॉस्पिटल असलेल्या डॉक्‍टरांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांना सरकारतर्फे पीपीई किट पुरवण्यात येईल. खासगी डॉक्‍टरांना समजावून सांगितले जाईल, परंतु त्यांनी न ऐकल्यास वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही टोपे यांनी दिला. 
कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पालकमंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. गृहमंत्री अनिल देशमुख, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. टोपे यांनी तांत्रिक बाबींमुळे अडखळलेली आरोग्य विभागाची प्रक्रिया रद्द होणार नाही, तर भरती होणार असे अधोरेखित केले. त्याचप्रमाणे मालेगावमधील 200 खाटांचे रुग्णालय कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी शंभर डॉक्‍टर, पॅरामेडिकल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून, या रुग्णालयाच्या सेवेत 24 तासांत डॉक्‍टर हजर न झाल्यास निलंबित करण्याची सूचना यंत्रणेला दिली असल्याची माहिती श्री. टोपे यांनी दिली. 

प्लाझमा थेरपी दिशानिर्देशानुसार 
मुंबईतील लीलावती रुग्णालयात प्लाझमा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली. तसेच दुसरा प्रयोग नायर रुग्णालयात होत आहे. हे पाहता प्लाझमा थेरपी यशस्वी होत आहे, असे दिसते. "आयसीएमआर'च्या दिशानिर्देशानुसार दाता-स्वीकृतकर्ता, नैतिक समितीचा अहवाल, प्लाझमाची टक्केवारी आदींचे पालन करून गरज आहे, अशा ठिकाणी प्लाझमा थेरपी शक्‍य आहे, असा निर्वाळा श्री. टोपे यांनी दिला. 

राजेश टोपे म्हणाले... 
- मालेगावमध्ये उत्तर महाराष्ट्र डॉक्‍टरांची नेमणूक केली जाईल 
- अज्ञानपणातून वैद्यकीय इलाज न घेणे योग्य नाही. त्यामुळे वैद्यकीय इलाज घेतला जावा म्हणून मौलाना, डॉक्‍टर आणि पोलिसांच्या माध्यमातून मालेगावमध्ये विनंती केली जाईल 
- मालेगावमध्ये झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांश जणांचा अत्यवस्थ झाल्यावर 24 तासांत मृत्यू 
- राज्यात टेस्टिंग वाढवून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न 
- नाशिक शहर, येवला आणि ग्रामीणमध्ये कोरोना नियंत्रणात 
- मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असली, तरीही अत्यवस्थ स्थिती नाही 
- मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून आवश्‍यकतेनुसार वातानुकूलित यंत्रे लावण्यात येतील 
- डॉक्‍टरांना हलक्‍या वजनाचे पीपीई किट देण्यात येतील 
- बाजारात सर्व प्रकारच्या औषधांची उपलब्धता 
- व्यवस्थापकीय त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातील 

 
मुंबईमध्ये सुधारणा होतेय 
मुंबईमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे सांगून श्री. टोपे यांनी कोरोनाबाधित दुप्पट होण्याच्या दिवसाप्रमाणे मृत्युदराची माहिती दिली. मुंबईत पूर्वी आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट व्हायची. आता दहा दिवस लागताहेत. देशाचे हे दिवस नऊ आहेत. याशिवाय पूर्वी मृत्यूदर पाच होता. तो आता साडेतीनपर्यंत आला आहे, असे सांगून श्री. टोपे यांनी मुंबईत होम क्वारंटाइन करणे शक्‍य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की "आयसीएमआर'च्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील 83 टक्के कोरोनाबाधित लोकांमध्ये लक्षणे आढळत नसल्याने त्यांना होम क्वारंटाइन करता येईल. दुसरीकडे संस्थात्मक क्वारंटाइनसाठी मुंबईत मैदान, पॅव्हेलियनमध्ये खाटा आणि ऑक्‍सिजनची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

 आरोग्यमंत्र्यांनी अतिरिक्त 60 डॉक्‍टर दिले
मालेगावमध्ये एक हजार 800 पोलिस कार्यरत आहेत. आवश्‍यकतेनुसार आणखी पोलिस आणि राज्य राखीव दल दिले जातील. त्याचप्रमाणे डॉक्‍टरांची गरज लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी अतिरिक्त 60 डॉक्‍टर दिले आहेत. मोठ्या प्रमाणात चाचण्या व्हाव्यात, सर्वेक्षण बळकट करावे, पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण अशा विविध बाबींचे निर्णय घेतले गेलेत. - अनिल देशमुख, गृहमंत्री 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..