esakal | बांगलादेशी घुसखोरांमुळे मालेगाव रडारवर! बनावट दाखल्यांसह आधारकार्डमध्येही आघाडी 
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon 123.jpg

मध्यंतरी महापालिकेच्या ऊर्दू शाळेतून शाळा सोडल्याच्या दाखल्यांच्या प्रतीच चोरीला गेल्या. नव्याने अटक केलेल्या दोन बांगलादेशींकडे आधारकार्ड, पासपोर्ट व पॅनकार्डही मिळून आले. एकाने तर मनपा कर्मचाऱ्याच्या मदतीने जन्मदाखलाही मिळविला. या सर्व प्रकारांमुळे शहरातील आधार केंद्र बोगस, बनावट दाखले चर्चेत आले. 

बांगलादेशी घुसखोरांमुळे मालेगाव रडारवर! बनावट दाखल्यांसह आधारकार्डमध्येही आघाडी 

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील आलम अमीन अन्सारी व ताहीरअली युसूफअली (रा. नईकुलसुरी, बांगलादेश) या दोन बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. आठवड्यापूर्वी मुंबई येथील साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बांगलादेशी घुसखोरांना बनावट आधारकार्ड व पासपोर्टसाठी बनावट दस्तऐवज व लोकप्रतिनिधींचे लेटरहेड पुरविणाऱ्या येथील एकाला अटक केली. अन्य एक घुसखोर फरारी आहे. घुसखोरांकडे येथील आजी-माजी आमदारांचे लेटरहेड मिळून आल्याने राज्यात चर्चा झाली. बांगलादेशी घुसखोरांमुळे शहर पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आले आहे. येथील बनावट दाखले, प्रतिज्ञापत्र, जन्मदाखले, शाळा सोडल्याचे दाखले चिंतेचा विषय झाला आहे. पोलिसांसमोर याप्रकरणी पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे. 

बांगलादेशी घुसखोरांमुळे मालेगाव पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर
शहरात २३ जून २०१९ ला झालेल्या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांनी जुन्या महामार्गावरील सुपर मार्केट परिसरात छापा टाकून मतदानासाठी वापरण्यात येणारे तब्बल एक हजारांहून अधिक बनावट आधारकार्ड जप्त केले होते. याप्रकरणी आयेशानगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मध्यंतरी महापालिकेच्या ऊर्दू शाळेतून शाळा सोडल्याच्या दाखल्यांच्या प्रतीच चोरीला गेल्या. नव्याने अटक केलेल्या दोन बांगलादेशींकडे आधारकार्ड, पासपोर्ट व पॅनकार्डही मिळून आले. एकाने तर मनपा कर्मचाऱ्याच्या मदतीने जन्मदाखलाही मिळविला. या सर्व प्रकारांमुळे शहरातील आधार केंद्र बोगस, बनावट दाखले चर्चेत आले. 

घुसखोर हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर
काही वर्षांपूर्वी जातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळीदेखील कार्यरत होती. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस व महसूल विभागाने आगामी काळात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. याशिवाय जहीर हाशीम हनिबा हा अन्य एक बांगलादेशी नागरिक फरारी आहे. शहरात शेकडो बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय येथे त्यांचे वास्तव्य शक्य नाही. शहरातील बांगलादेशी घुसखोर हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..
 
लोकप्रतिनिधींकडूनही पाठबळ 
महापालिकेतील दहापेक्षा अधिक नगरसेवक, नगरसेविकांचे दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. दोघा-तिघा नगरसेवकांचे अपात्रतेचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यापूर्वी महापालिकेतील दोघा नगरसेवकांचे सदस्यत्व दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने रद्द झालेले आहे. काही नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत. अंतिमक्षणी प्रकरणात नगरसेवक व तक्रारदार यांच्यात आर्थिक देवाणघेवाण व तडजोडीचे प्रकारही सर्रास होतात. पूर्व भागात काही नगरसेवकांनी दोनपेक्षा जास्त अपत्य झाल्यानंतर त्यांनी अपत्य नोंद करताना स्वत:चे नाव नोंदविण्याऐवजी मुलाच्या नावासमोर भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकाचे नाव नोंदवून मुलगा त्याचा असल्याचे दाखविण्याचे प्रकारही सर्रास घडतात. यातून नगरसेवक व लोकप्रतिनिधीच बनावट प्रकरणांना चालना देत असल्याची चर्चा आहे.  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

go to top