धक्कादायक! सदैव 'इन एक्शन' मोडमध्ये असणारे आयुक्त...आज आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर?

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 13 May 2020

दोन आठवड्यापूर्वीच आयुक्तांची येथे अमरावतीहून नियुक्ती झाली होती. त्यांनी मोठ्या जोमाने कामकाज सुरू केले होते. कामचुकार 47 अधिकारी, कर्मचारीं विरूध्द गुन्हे दाखल केले होते. पीपीई कीट व सुरक्षा साहित्य वाटप न करणारे भांडारपालचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला होता. आयुक्तांवरच संकट कोसळल्याने आजवर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या पाचावर धारण बसली आहे. 

नाशिक / मालेगाव : महापालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्तांसह शहरात आज दिवसभरात 36 नवीन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहर हादरले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत असतांनाच आयुक्तांना ही माहिती मिळाली, अन् ते शासकीय विश्रामग्रुहातील बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले. 

नियुक्ती होताच आयुक्त होते इन एक्शन
शहरात करोनाचा कहर सुरू असतानाच तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे हे रजेवर गेल्याने नगर विकास विभागाने अमरावती येथून अधिकाऱ्याची मालेगावच्या महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. २८ एप्रिल रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला होता. त्यानंतर करोना संदर्भात त्यांनी धडाक्यात कामकाज सुरू केले होते. दोन आठवड्यापूर्वीच आयुक्तांची येथे अमरावतीहून नियुक्ती झाली होती. त्यांनी मोठ्या जोमाने कामकाज सुरू केले होते. कामचुकार 47 अधिकारी, कर्मचारीं विरूध्द गुन्हे दाखल केले होते. पीपीई कीट व सुरक्षा साहित्य वाटप न करणारे भांडारपालचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला होता. आयुक्तांना थेट लागण झाल्याने, आजवर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या पाचावर धारण बसली आहे. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आयुक्त, सहाय्यक आयुक्तांसह दिवसभरात 36 नवीन कोरोना पाँझिटिव्ह. 
शहरातील आज आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये येथील प्रथितयश डॉक्टरचा समावेश आहे. याशिवाय 16 पोलिस व दोन राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश आहे. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक बंदोबस्तावरील कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Municipal Commissioner, Assistant Commissioner along with 36 new corona positive today nashik marathi news