BIG BREAKING : मालेगाव हादरले...चक्क महापालिका आयुक्तच कोरोना पॉझिटिव्ह...आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत होते हजर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक अहवाल समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले.

नाशिक/मालेगाव : मालेगवकरांसाठी बुधवारचा आजचा दिवस चिंताजनक असून (ता.१३) धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच घाम फुटला. चक्क मालेगावचे महापालिका आयुक्त यांचा अहवालच कोरोना संसर्ग बाधीत आल्याने आता खळबळ माजली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तासह 11 नवीन पाँझिटिव्ह देखील आढळले आहेत.

आयुक्त आरोग्यमंत्री मिटींगमधून तडकाफडकी रवाना.

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक त्यांचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे  समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसमवेतच, कृषी मंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी व  विविध शासकीय अधिकारी होते. आता पुढे नेमके काय शासन यावर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.. कारण बैठकीत सर्व प्रशासकीय मंडळी होती. आणि त्यात आयुक्त वावरत होते.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Municipal Commissioner's report positive corona infection nashik marathi news