esakal | तो एकटाच विकायचा कुत्ता गोळ्या अन् गर्भपाताच्या गोळ्या...तपासणी केल्यास पोलीसांनाही धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon kutta goli 1.jpg

वसीम हा नशेच्या गोळ्या, औषधे विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे परजिल्ह्यात कनेक्‍शन असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक निरीक्षक प्रदीप आव्हाड व सहकाऱ्यांनी कारवाई केली होती.

तो एकटाच विकायचा कुत्ता गोळ्या अन् गर्भपाताच्या गोळ्या...तपासणी केल्यास पोलीसांनाही धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : वसीम हा नशेच्या गोळ्या, औषधे विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे परजिल्ह्यात कनेक्‍शन असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक निरीक्षक प्रदीप आव्हाड व सहकाऱ्यांनी कारवाई केली होती.

पोलीसांनी घेतले ताब्यात

शहरातील आझादनगर भागात नशेच्या गोळ्या, औषधे व स्टेरॉइड इंजेक्‍शन बेकायदा विक्री करणाऱ्या वसीम अब्दुल खालीक शेख (वय 30, रा. जुना आझादनगर) याला विशेष पोलिस पथकाने मंगळवारी (ता.१६) मध्यरात्री अटक केली. त्याच्या ताब्यातून नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, कुत्ता गोळी, कोरेक्‍स औषधे, दुचाकी, मोबाईल असा तीन लाख 10 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी (ता. 17) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

पावणेतेरा लाख रुपयांचा ऐवज जप्त
घुगे यांनी वसीम हा नशेच्या गोळ्या, औषधे विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे परजिल्ह्यात कनेक्‍शन असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक निरीक्षक प्रदीप आव्हाड व सहकाऱ्यांनी कारवाई केली होती. संशयित वसीमकडून त्या वेळी एक लाख 74 हजार 376 रुपयांच्या नशेच्या व गुंगी येणाऱ्या गोळ्या, तसेच 11 लाख रुपये किमतीच्या फोर्ड इको स्पोर्ट गाडीसह पावणेतेरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश

पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, समाधान सानप व अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे यांनी सापळा रचून आझादनगर भागात वसीमला अटक केली. त्याच्या ताब्यातून अल्प्राझोलमच्या 105 स्ट्रिप, कोरेक्‍स खोकल्याच्या औषधाच्या 175 बाटल्या, गर्भपाताच्या गोळ्या, व्हियाग्रा 720 गोळ्या, स्टेरॉइडची खुशी नावाची 25 इंजेक्‍शन असा सुमारे तीन लाख 10 हजार 600 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या वेळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. वसीमला बुधवारी (ता. 17) दुपारी न्यायालयात उभे केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

चौकशीसाठी दोन स्वतंत्र पथके

शहरात सराईत गुन्हेगारांसह काही तरुण अल्प्राझोलम (कुत्ता गोळी) या गुंगी व नशा येणाऱ्या गोळ्यांचे सेवन करतात. संशयित स्वत:च विक्री करतात. वसीम एकट्यानेच गोळ्या विक्री करीत होता. त्याने गोळ्या कोठून आणल्या याबाबत चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील संशयितांची संख्या वाढू शकते. चौकशीसाठी दोन स्वतंत्र पथके करण्यात आली आहेत. धुळे, नाशिक, नगर या भागातून विनापरवाना या गोळ्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती आहे. -संदीप घुगे अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव  

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

go to top