फळांच्या राजाची एंट्रीच न्यारी...डाळिंबाचा भाव थेट अर्ध्यावरच!

mangoes-pune.jpg
mangoes-pune.jpg

नाशिक/ मालेगाव : येथील वाढत्या आंब्याच्या आवकेमुळे डाळिंबाला फटका बसत असून, आणखी किमान 15 दिवस भाव असेच राहण्याची शक्‍यता आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर घाऊक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी आणण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील डाळींब उत्पादक हवालदिल 

लॉकडाउनचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना गाव व परिसरातच मिळेल, त्या किमतीत फळे व भाजीपाला विकावा लागला. नगदी पीक असलेल्या शेवग्यासह इतर फळभाज्यांना मातीमोल दर मिळाला. टरबूज, खरबूज पाच ते सात रुपये, तर द्राक्षे आठ ते दहा रुपये किलोने विक्री झाले. अशा परिस्थितीतही डाळिंबाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. 40 रुपयांपेक्षा जादा दर डाळिंबाचा राहिला. जवळपास महिन्यापासून येथील बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला 60 ते 70 रुपये किलो भाव मिळत होता. मात्र आठवड्यापासून उत्तर प्रदेशमधील सहारनपूर, लखनौ, सीतापूर, मालियाबाद आदी भागातून लंगडा व दशेरी या आंब्याची आवक वाढली आहे. त्याचे भाव 40 ते 60 रुपयांदरम्यान असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. आंब्याची आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी झाले. सध्या येथील बाजारात 30 ते 35 रुपये किलोने डाळिंब विकला जात आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला 40 ते 45 रुपये भाव मिळत आहे. 

ग्राहकांकडून आंब्याची मागणी आहे. दशेरी व लंगडा कमी किमतीत मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना तो परवडतो. आणखी 15 दिवस आंब्याची आवक याच पद्धतीने राहील. आवक कमी झाल्यानंतरच डाळिंबाचे भाव वाढू शकतील. - फकिरा शेख, फळांचे घाऊक व्यापारी, मालेगाव 

शेतकऱ्यांनी डाळिंबाचा आंबे बहार घेताना तो थोडा अर्ली घ्यावा, जेणेकरून मे महिन्या अखेर माल बाजारात जाईल. जूनमध्ये आंब्याची आवक वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव पडून शेतकऱ्यांचे नुकसान होते. आंबे बहार जानेवारी-फेब्रुवारीत घ्यावा. तसेच अर्ली मृग बहार मेमध्ये धरल्यास दसरा-दिवाळीपर्यंत डाळिंब बाजारात येऊ शकतो. - अरुण देवरे उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com