माथाडी कामगारांचा संप : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद; शेतकऱ्यांची अडचण

अमोल खरे 
Monday, 14 December 2020

 संप, आंदोलन, सुट्ट्या यासह विविध कारणांसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली आहे. बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. आज ता १४  सोमवारी रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे आजही येथील बाजार समितीतील व्यवहार ठप्पच होते.

मनमाड (जि.नाशिक) : केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात तसेच शेतमाल बाजार समितीमध्येच विकावा या मागणीसाठी  राज्यातील माथडी कामगार संघटनेने पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे  मनमाड बाजार समितीमध्ये आज कांदा व मका लिलाव ठप्प झाल्याने बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. मनमाड बाजार समितीच्या आवारात माथाड़ी संघटनेने निर्दशने करत जोरदार घोषणाबाजी केली.  लेव्हीचा प्रश्न निकाली काढ़ावा माथाडी मापाऱ्यांना फंडाची रक्कम दुप्पट करावी , बोनस मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. मात्र बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. 

शासनाकडून दुर्लक्ष

 संप, आंदोलन, सुट्ट्या यासह विविध कारणांसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली आहे. बाजार समितीत कांदा, मका, भुसार मालाची मोठी आवक होत असताना बंदमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. आज ता १४  सोमवारी रोजी माथाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या सादर करत बंदची हाक दिली. त्यामुळे आजही येथील बाजार समितीतील व्यवहार ठप्पच होते.कोरोना काळापासून माथाडी कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत. मात्र, याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज माथाडी कामगार संघटनेच्यावतीने बंदची हाक देण्यात आली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत १३६ हून अधिक माथाडी कामगार बंदमध्ये सहभागी झाले असल्याने बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प आहेत. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी बंद पुकारला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक

नांदगाव तालुक्यात मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती महत्वाची बाजारपेठ आहे. नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भाग, येवला, चांदवड, मालेगाव या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक असते. मात्र, गेल्या महिन्याभरात व्यापारी, शेतकरी आंदोलनामुळे तब्बल तीन वेळा ही बाजार समिती बंद राहिली आहे. माथाडी कामगारांच्या मागण्यांमध्ये लेव्हीचा प्रश्न निकाली काढ़ावा माथाडी मापाऱ्यांना फंडाची रक्कम दुप्पट करावी , बोनस मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्या माथाडी कामगार संघटनेने सादर केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmad Agricultural Produce Market Committee closed nashik marathi news