कारखानदारास अडवून ३० हजारांची जबरी लूट; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रमोद सावंत
Thursday, 24 September 2020

शहरातील रमजानपुरा भागातील तरुण कारखानदारास रस्त्यात अडवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच चौघांनी धक्कादायक प्रकार केल्याची घटना घडली. वाचा काय घडले?

नाशिक : (मालेगाव) शहरातील रमजानपुरा भागातील तरुण कारखानदारास रस्त्यात अडवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच चौघांनी धक्कादायक प्रकार केल्याची घटना घडली. वाचा काय घडले?

अशी घडली घटना

द्याने शिवारातील कारखान्यावरून अक्रमअली अजगरअली जात होते. रस्त्यात त्यांना हारुण शेख रहेमान ऊर्फ हारुण भाया (वय ५०), शेख साबीर शेख हारुण (२४, दोघे रा. हाजी अहमदपुरा), रिजवान अहमद सलीम अहमद ऊर्फ रिजवान शेठ (३८, रा. नवीन बसस्थानक) व शेख इरफान शेख चाँद ऊर्फ अंधा (रा. आयेशानगर) या चौघांनी अडवून त्यांच्याकडे पैसे मागितले. अजगरअलीने नकार देताच त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाइपने गुडघ्याखाली जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

चौघांविरुध्द गुन्हा दाखल

रमजानपुरा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण व जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी इरफान ऊर्फ अंधा वगळता अन्य तिघा संशयितांना अटक केली आहे. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the manufacturer 30 thousand were robbed nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: