ब्रेकिंग : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्त निश्चित; अखेर ठरली 'तारीख'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण नाशिक निश्चित झाल्याची घोषणा झाल्यानंतर ते कधी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती, अखेर आता या संमेलनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण नाशिक निश्चित झाल्याची घोषणा झाल्यानंतर ते कधी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती, अखेर आता या संमेलनाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुहूर्त निश्चित.
मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार असून याची तारीख २६, २७ व २८ मार्च २०२१ अशी निश्चित करण्य़ात आली आहे.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ प्रतिनिधी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे,

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

नाशिकमध्ये निश्चितीची घोषणा
९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकमधून दोन, सेलू येथून एक, पुण्यातून (दिल्लीसाठी)) एक आणि अंमळनेरमधून एक अशी पाच आमंत्रणे आली होती. पुण्याच्या 'सरहद्द' संस्थेनं फेर निमंत्रण पाठवलं होतं. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. मात्र, महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते.साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं त्यानंतर या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर  स्थळ नाशिकमध्ये निश्चितीची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Sahitya Sammelan date fixed nashik marathi news