नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन घेण्यासंबंधीच्या हालचालींना वेग; पालकमंत्र्यांपर्यंत पोचवली माहिती

महेंद्र महाजन
Sunday, 20 December 2020

उस्मानाबाद येथे गेल्यावर्षी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकमध्ये संमेलन घेण्याचे निमंत्रण नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात आले आहे. साहित्य महामंडळातर्फे निमंत्रणाचा विचार होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे संमेलन नाशिकमध्ये होण्याचे संकेत मिळताहेत.

नाशिक : उस्मानाबाद येथे गेल्यावर्षी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकमध्ये संमेलन घेण्याचे निमंत्रण नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात आले आहे. साहित्य महामंडळातर्फे निमंत्रणाचा विचार होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे संमेलन नाशिकमध्ये होण्याचे संकेत मिळताहेत.

संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत यासंबंधीची माहिती पोचवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाची सोमवारी (ता. २१) बैठक होत आहे. त्यामध्ये संमेलनाच्या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित आहे. 

संस्थेच्या निमंत्रणाचा विचार होईल

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे अंमळनेर, दिल्ली आणि नाशिक येथून निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्लीसाठी सरहद्द संस्थेतर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. सरहद्द संस्थेने घुमान (पंजाब) येथील संमेलन यशस्वी केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळ नाशिकला पसंती देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकला सांस्कृतिक पार्श्वभूमी असून सार्वजनिक वाचनालय ही सर्वात ज्येष्ठ संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या निमंत्रणाचा विचार होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​

सम्मेलनासाठी साहित्यिकांची मोर्चेबांधणी

सार्वजनिक वाचनालय संस्थेची कायदेशीर प्रक्रिया धर्मदाय आयुक्तांकडे सुरु आहे. त्यासंबंधीचा आदेश जानेवारी २०२१ येण्याची येऊ शकेल काय? याचा अभ्यास सुरु आहे. २०१७ मधील वाचनालयाच्या निवडणुकीचे हे प्रकरण आहे. कायदेशीर बाबींचा अभ्यास करणाऱ्यांनी वाचनालयाविरुद्ध आदेश गेल्यास काय करायचे? असा प्रश्‍न तयार झाल्याने अन्य संस्थेतर्फे संमेलन घेण्याची तयारी सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे. संमेलन घेऊ नये, असे काही जणांचे म्हणणे आहे. याच पार्श्‍वभूमीवर संमेलन नाशिकला व्हावे, यासाठी वाचनालयाशी निगडीत असलेल्या काही जणांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी काही जणांनी ही बाब पालकमंत्र्यांपर्यंत पोचवल्याची माहिती मिळाली. सार्वजनिक वाचनालयाने संमेलनासाठी असर्थमता दर्शवल्यास संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाचा पुढाकार असावा, अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कौल नाशिकला मिळाल्यास आयोजक संस्था बदलली, तरी हे संमेलन नाशिक येथे व्हावे अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. संमेलन नाशिकला व्हावे यासाठी आता साहित्यिक सरसावले असून संस्था कोणतीही असो ठिकाण नाशिक असायला हवे, यासाठी आता साहित्यिकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Sahitya Sammelan is likely to be held in Nashik marathi news