esakal | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार 'नाशिक'मध्येच! शुक्रवारी होणार औपचारिक घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

marathi sahitya sammelan.jpg

संमेलनासाठी सार्वजनिक वाचनालय व लोकहितवादी मंडळ (नाशिक), वाङ्मयीन मंडळ (अमळनेर) सेलू (जि. परभणी) आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीसाठीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण भेटीसाठी स्वीकारल्याने दिल्लीत संमेलन घेण्याची शक्यता मावळली होती. दरम्यान शुक्रवारी (ता.८) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बैठक होणार आहे त्यानंतर नाशिकच्या नावाची घोषणा होणार होईल. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार 'नाशिक'मध्येच! शुक्रवारी होणार औपचारिक घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घ्यावे कि नाही यासाठी गुरुवारी (ता. ७) गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्थळ निवड समितीने पाहणी करण्यात आली.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकचे नाव निश्चित मानले जात आहे. संमेलनासाठी गाेखले एज्युकेशन सोसायटीचा कॅम्पस, डाेंगरे वसतिगृह मैदान, तपाेवनातील जागा ही स्थळे समिती बघणार असल्याचे काहींनी सांगितले मात्र एकमेव गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयचाच विचार झाल्याचे महामंडळाच्या सदस्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच 

संमेलनासाठी सार्वजनिक वाचनालय व लोकहितवादी मंडळ (नाशिक), वाङ्मयीन मंडळ (अमळनेर) सेलू (जि. परभणी) आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीसाठीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण भेटीसाठी स्वीकारल्याने दिल्लीत संमेलन घेण्याची शक्यता मावळली होती. दरम्यान शुक्रवारी (ता.८) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बैठक होणार आहे. त्यानंतर नाशिकच्या नावाची घोषणा होणार होईल. 

दिल्लीची शक्यता महामंडळाने फेटाळली

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे आदी सदस्य स्थळ पाहणी दौऱ्यात होते. सदस्यांनी गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून आढावा घेतला.

अहवाल सादर झाल्यानंतर निर्णय : कार्यवाह डॉ. दादा गोरे
निवासाची व्यवस्था, ग्रंथालयात काय व्यव्यस्था आहे, भोजनाची व्यवस्था, संमेलनाची जवळपास किती लोकांची जागा आहे या सगळ्याची पाहणी केली असून सदस्य उद्याच्या बैठकीत अहवाल सादर केल्यानंतर  नाशिकला संमेलन द्यायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. दिल्लीबाबत महामंडळाने आधीच निर्णय घेतला आहे. दिल्लीत स्थळ पाहणी होणार नसून नाशिक मध्ये आम्ही फक्त गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी बघता शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन निर्णय घेतले जातील.

हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती

संमेलन गुणवत्तापूर्णक होईल : जातेगावकर  
लोकहितवादी मंडळाने नाशिकरांच्यावतीने निमंत्रण दिलेले आहे. ठक्कर डोम, डोंगरे वसतिगृह, भोसला मिल्ट्री स्कुल,तपोवनातील जागा, स्वामीनारायण मंदिर परिसर या जागा या पूर्वी महामंडळाला दाखविल्या आहेत. गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागेत निसर्गाचे वरदान आहे, त्याचबरोबर महाविद्यालयात जवळपास ३० हजार विद्यार्थी आहेत. त्यामुळे पुस्तकविक्री याठिकाणी अधिक होईल. नाशिकरांना सोयीची अशी या महाविद्यालयाची जागा असून स्थळ पाहणी समितीचा जो निर्णय असेल ते उद्या जाहीर करणार आहे. संमेलन कोरोनाचे सगळे नियम पाळूनच घेतले जाईल. पुस्तकांच्या दोन स्टोलमध्ये अंतर ठेवलेले आहे. नेटफ्लिक्स अमेझॉन मध्ये जी लोक अडकली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढून पुस्तक वाचन संस्कृती अधिक कशी वाढेल आणि संमेलन गुणवत्ता पूर्ण कसे केले जाईल यासाठी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा >  डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना