esakal | विवाहितेचे विचित्र वागणे बेतले तिच्याच जीवावर...दुर्दैवी घटनेने कुटुंबीयही हादरले
sakal

बोलून बातमी शोधा

death body.jpg

विवाहिता चार पाच दिवसापासून अचानक घरातून निघून गेली. घरच्या माणसांनी खूप शोध घेतला ती काही सापडली नाही. अखेर डिक्सळ येथील नागरिकांना जंगलात काहीतरी संशयास्पद आढळले. त्यानंतर झाला खुलासा..

विवाहितेचे विचित्र वागणे बेतले तिच्याच जीवावर...दुर्दैवी घटनेने कुटुंबीयही हादरले

sakal_logo
By
देवदत्त चौधरी

नाशिक / म्हसगण : विवाहिता चार पाच दिवसापासून अचानक घरातून निघून गेली. घरच्या माणसांनी खूप शोध घेतला ती काही सापडली नाही. अखेर डिक्सळ येथील नागरिकांना जंगलात काहीतरी संशयास्पद आढळले. त्यानंतर झाला खुलासा..

अशी घडली घटना

म्हसगण येथील रत्ना रामदास शिंगरे ही विवाहिता हि गेल्या वर्षभरापासून मनोरुग्ण होती. ती काही वेळ घरात राहायची तर काही दिवस अचानक घरातून गायब व्हायची अन् आठ दहा दिवस जंगलात राहायची. बऱ्याचदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. या वेळेसही ती चार पाच दिवसापासून अचानक घरातून निघून गेली. घरच्या माणसांनी खूप शोध घेतला ती काही सापडली नाही. पण ता. 4 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यूदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत डिक्सळ येथील नागरिकांना जंगलात आढळून आला. पोलीस पाटलांनी त्वरित पेठ पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी पंचनामा करून ओळख पटवून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या विवाहितेने डिक्सळ येथील जंगलात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

रिपोर्ट - देवदत्त चौधरी

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ