एमबीए सीईटीचा निकाल जाहीर; आता प्रतीक्षा कॅप राउंड प्रक्रियेची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासंदर्भातील प्रकरण न्यायालयात गेल्याने एमबीए प्रवेशाची प्रक्रिया दीर्घ काळ रखडलेली होती. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांना स्थगिती दिली जात असतांना यंदा एमबीएच्या प्रवेश प्रक्रियेला मात्र गती मिळण्याची स्थिती आहे. 

नाशिक : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मार्च महिन्यात सीईटी परीक्षा झाली होती. या सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी (ता.23) ऑनलाईन स्वरूपात जाहीर केला आहे. निकालाच्या यादीत 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. 

प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याची स्थिती

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली सीईटी ही प्रवेश परीक्षा घेतली जात असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना स्थगिती दिलेली आहे. मात्र कोरोनाचा फैलावाने वेग धरण्यापूर्वी गेल्या 14 व 15 मार्चला एमबीए, एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता.23) जाहीर केला आहे. सीईटीसेलतर्फे निकालाकरीता 1 लाख 10 हजार 631 उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासंदर्भातील प्रकरण न्यायालयात गेल्याने एमबीए प्रवेशाची प्रक्रिया दीर्घ काळ रखडलेली होती. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांना स्थगिती दिली जात असतांना यंदा एमबीएच्या प्रवेश प्रक्रियेला मात्र गती मिळण्याची स्थिती आहे. 

44 विद्यार्थ्यांना शुन्य पर्सेंटाईल

निकालाच्या प्रतित संबंधित विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक, आसन क्रमांक व नावासह सीईटी परीक्षेत मिळालेले गुण व या गुणांच्या आधारे पर्सेंटाईलचा तपशील उपलब्ध केला आहे. त्यानुसार राज्यभरातील 44 विद्यार्थ्यांनी शून्य पर्सेंटाईल प्राप्त केले आहे. तर 10 विद्यार्थ्यांना केवळ एक गुण मिळविला आहे.

हेही वाचा > चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता

कॅप राउंड प्रक्रियेकडे लक्ष 

निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या प्रक्रियेकडे लक्ष लागून आहे. सीईटी सेलतर्फे यासंदर्भातील सविस्तर तपशील जारी केला जाणार आहे. परंतु सध्या शाळांसह महाविद्यालयेदेखील बंद असल्याने कागदपत्र पडताळणी व अन्य प्रक्रिया राबविणे आव्हानात्मक असणार आहे.  

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA CET results announced; The list includes 1 lakh 10 thousand students nashik marathi news