VIDEO : संतापजनक! कोरोना हॉट्स्पॉटमध्ये जीव धोक्यात घालून ज्या परिचारिका सेवेसाठी जातात..त्यांचीच रात्रभर अशी अवस्था?

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 May 2020

मालेगाव शहरात कोरोनाचा प्रसार सतत वाढत आहे. यासंदर्भात प्रशासनाने नियोजन करुन नाशिकहून वैद्यकीय कर्मचारी यावेत अशी सुचना केली होती. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयातील वीस डॉक्टर आणि चोविस परिचारीका शनिवारी सायंकाळी मालेगावला गेल्या होत्या. त्यांना निरोप देण्यात आल्याप्रमाणे ते सगळे आपल्या निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना धक्काच बसला..

नाशिक / मालेगाव : मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच, मालेगाव शहर राज्यभर चिंतेचा विषय आणि हॉटस्पॉट बनला आहे. यासंदर्भात प्रशासनाने नियोजन करुन नाशिकहून वैद्यकीय कर्मचारी यावेत अशी सुचना केली होती. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयातील वीस डॉक्टर आणि चोविस परिचारीका शनिवारी सायंकाळी मालेगावला गेल्या होत्या. त्यांना निरोप देण्यात आल्याप्रमाणे ते सगळे आपल्या निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना धक्काच बसला..

असा घडला प्रकार

मालेगाव शहरात कोरोनाचा प्रसार सतत वाढत आहे. यासंदर्भात प्रशासनाने नियोजन करुन नाशिकहून वैद्यकीय कर्मचारी यावेत अशी सुचना केली होती. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयातील वीस डॉक्टर आणि चोविस परिचारीका शनिवारी सायंकाळी मालेगावला गेल्या होत्या. त्यांना निरोप देण्यात आल्याप्रमाणे ते सगळे आपल्या निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले असता ते आदिवासी विद्यार्थी वसतिगृह होते. अनेक दिवसांपासून ते बंद होते. त्याची स्वच्छताही झालेली नव्हती. हे कर्मचारी पोहोचले तेव्हा सगळीच दुरावस्था होती. स्वच्छतागृह, पाण्याची सोय, पलंग, गाद्या, एव्हढेच काय खिडक्याही तुटलेल्या होत्या. दरवाजे लागत नव्हते. एका मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांनी एकत्र राहावे असा प्रस्ताव होता.

वेगळ्याच समस्यांना सामोरे 

या संदर्भात महापालिकेच्या प्रशासनालाही कल्पना नव्हती. कोणीही यावेळी येथे उपस्थित नव्हते. कोणाशी संपर्क करावा याचीही सूचना नव्हती. त्यामुळे येथील काही कर्मचारी अक्षरशः व्हरांड्यात राहिले. कोरोनाचा वाढता संसर्ग व त्याचा वैद्यकीय सुविधांवर येणारा ताण लक्षात घेता हे कर्मचारी मालेगावला गेले होते. मात्र त्यांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तो चर्चेचा विषय होता. गेले अनेक दिवस धूळखात पडलेल्या या वसतिगृहाची दुरावस्था झालेली असतानाही डॉक्टर, परिचारीकांच्या निवासस्थानाची व्यवस्था तेथे करण्यात आली होती. याबाबत सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली. यातील काही कर्मचाऱयांनी ही छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामुळे खळबळ उडाली. 

कर्मचारी अक्षरशः संतप्त

मालेगावातील वैद्यकीय कर्मचारी कमी असल्याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील 44 कर्मचारी मालेगावला गेले होते. मात्र त्यांच्या निवासाची व्यवस्था एवढी बिकट की त्यांना अक्षरशः व्हरांड्यात राहून काढावी लागली. त्यामुळे हे कर्मचारी इतके संतप्त झाले की त्यांनी थेट वरिष्ठांकडे नाराजी कळवली. परिचारीका संघटनेने याबाबत मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. 

हेही वाचा > धक्कादायक! मोदींचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल...अन् ओझरहून 'त्या' विमानाचे टेकऑफच नाही?

जिल्हा परिचारिका असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणतात... 
मालेगाव येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या सुचनेनुसार या परिचारीका व डॉक्टर्स तीथे गेले होते. त्यांच्या व्यवस्थेचे योग्य नियोजन व्हायला हवे होते. मात्र तसे काहीही झालेले नव्हते. यासंदर्भात नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाने यांच्याशी चर्चा करुन पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र याबाबत संबंधीतांकडे पाठपुरावा करणार आहोत.असे जिल्हा परिचारिका असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार म्हणाल्या.

हेही वाचा > लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical staff spend night at roadside at malegaon nashik marathi news