
कारसेवकांनी शरयू नदीच्या पुलावरून अयोध्येत प्रवेश करण्यासाठी अंत्ययात्रा काढली. ती जिवंत कारसेवकाची. तिरडीवर बांधला, पुढे अग्नी घेतलेला क्षौर केलेला कारसेवक आणि मागे सारे ‘राम बोलो भाई राम’ करत चालले. रामाचे नाव घ्यायलासुद्धा बंदी. त्यावर हा तोडगा काढला. विस्तीर्ण पात्र पुलाचा अर्धा भाग पार झाला अन् घात झाला.
नाशिक : ऑक्टोबर १९९० मध्ये आमची नाशिकमधून ५५ कारसेवकांची तुकडी कारसेवेसाठी निघाली. निघालो. रेल्वेने जाताना भोपाळला थांबलो. दोन गट झाले. एक चित्रकूटमार्गे राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली गेला. आम्ही बिना, सागर, सतना, कटनी करत प्रयागला सच्चा बाबा आश्रमात पोचलो. दुसऱ्या दिवशी अलाहाबादला लाठीचार्ज झाला. पोलिसांनी रात्री दीडला पकडून ट्रकमधून चिलबिलाच्या जंगलात नेऊन सोडले. तेथून चालत अयोध्येकडे निघालो. संतोष मोरेश्वर फडके यांनी अनुभवलेला एक प्रसंग....
‘भाईसाहब, भगवान रामजी को हमारे पूर्वजो ने नैय्या पार कराई थी
तीन दिवस तीन रात्री चालत मिश्रीली कुशभवनपूर रामगंज, हैदरगंज, सुलतानपूर, दर्शननगरमार्गे अयोध्या. ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि मार्ग दाखविणारी चिन्हे होती. सुलतानपूर जिल्ह्यात गोमती नदी पार करायची होती. एकच नाव, एकच नावाडी. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कारसेवक आमच्या आधी अनेक लोकांना त्याने नदी पार करून दिली होती. पैलतीरावर गेल्यावर त्याला पैसे देऊ केले. त्याचे वाक्य होते, ‘भाईसाहब, भगवान रामजी को हमारे पूर्वजो ने नैय्या पार कराई थी. आप लोग इतनी दूर से रामजी के मंदिर की सेवा करने आए हैं और हम आपसे पैसा लेंगें? हमे शरम आती है।’
विस्तीर्ण पात्र पुलाचा अर्धा भाग पार झाला अन् घात झाला.
कारसेवकांनी शरयू नदीच्या पुलावरून अयोध्येत प्रवेश करण्यासाठी अंत्ययात्रा काढली. ती जिवंत कारसेवकाची. तिरडीवर बांधला, पुढे अग्नी घेतलेला क्षौर केलेला कारसेवक आणि मागे सारे ‘राम बोलो भाई राम’ करत चालले. रामाचे नाव घ्यायलासुद्धा बंदी. त्यावर हा तोडगा काढला. विस्तीर्ण पात्र पुलाचा अर्धा भाग पार झाला अन् घात झाला. त्या तिरडीवरच्या मृतदेहाच्या नाकात गवताची काडी गेली आणि तो जोरात शिंकला. पोलिसांचा लाठीमार-गोळीबार सुरू झाला. तिकडे कोठारी बंधूंनी घुमटावर भगवा फडकवला. त्याचा राग येऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांना ठार केले. अनेक वेशांतरे करून अशोक सिंघल अयोध्येत पोचलेले आणि लाठीमारात कारसेवक जखमी झाले.
रिपोर्ट - महेंद्र महाजन
संपादन - ज्योती देवरे
हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...