esakal | एक आठवण : ऋषी कपूर यांना नाशिकच्या विविध प्रेक्षणीय स्थळांविषयी प्रेम!
sakal

बोलून बातमी शोधा

rishi kapoor 1.jpg

ऋषी कपूर "ऑल इज वेल' चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त नाशिकला तब्बल अठरा दिवस होते. त्याकाळात त्यांच्या फोर्च्युनर गाडीवर नाशिक रोड भागातील अरुण चव्हाण चालक होते. चालक असूनही अखेरपर्यंत "अरुणजी...' म्हणूनच सन्मानाने बोलणारे ऋषीकपूर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर भावनावश चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना आठवणी जागविल्या. 

एक आठवण : ऋषी कपूर यांना नाशिकच्या विविध प्रेक्षणीय स्थळांविषयी प्रेम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर चित्रीकरणानिमित्त नाशिकला तब्बल अठरा दिवस मुक्कामी होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने नाशिकच्या विविध प्रेक्षणीय स्थळांच्या ते प्रेमात पडले होते. त्यांच्यासोबत चालक म्हणून कार्यरत असलेल्या नाशिक रोड येथील अरुण चव्हाण यांनी विविध आठवणी जागविल्या. 

ऋषी कपूर यांच्या नाशिकच्या आठवणींना उजाळा 

ऋषी कपूर "ऑल इज वेल' चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त नाशिकला तब्बल अठरा दिवस होते. त्याकाळात त्यांच्या फोर्च्युनर गाडीवर नाशिक रोड भागातील अरुण चव्हाण चालक होते. चालक असूनही अखेरपर्यंत "अरुणजी...' म्हणूनच सन्मानाने बोलणारे ऋषीकपूर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर भावनावश चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना आठवणी जागविल्या. 

सिन्नरचे चित्रीकरण सिमला 
मुंबईतील त्यांच्या निवासस्थानापासून तर रोज चित्रीकरणाच्या निमित्ताने ताज हॉटेल ते पांढुर्ली, पहिने (त्र्यंबकेश्‍वर) अशा विविध भागांत त्यांच्या प्रवासात साथसंगत असायची. चित्रपटातील नियोजित अभिनेत्री याच खासदार झाल्याने त्यांच्या जागी सुप्रिया पाठक यांना संधी दिली गेली. त्यामुळे वेळेत चित्रीकरण करताना नाशिकच्या अमित कुलकर्णी यांच्या मदतीने चित्रपटासाठी पावसाळ्यात जिल्ह्यातील नाशिकचे प्रेक्षणीय स्थळ सिमला म्हणून चित्रीत करण्याचे ठरले. घोरवड (ता. सिन्नर) येथील घाट, घोटी-सिन्नर रस्त्यावरील काही स्थळं, सिमला पासिंग क्रमाकांच्या वाहनापासून, तर पंजाबी ढाबा म्हणून सिन्नर-घोटी मार्गावरील "आप्पाचा ढाबा' दाखविण्यात आला. रोज 
ताज ते वडनेर, विहितगाव लॅम रोडमार्गे हा प्रवास एकाच गाडीतून व्हायचा. चित्रीकरणाशिवाय विहितगाव येथील अण्णा गणपती मंदिर पाहिले. बूट काढून सश्रद्ध भावनेने ते विविध मंदिरांत काही वेळ थांबून त्यांच्या नामस्मरण करण्याच्या कृतीतून त्यांच्यातील माणूसही दिसला, असे चव्हाण यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

खाद्यपदार्थांचे शौकिन 
ऋषी कपूर खाद्यपदार्थांचे शौकिन होते. नाशिकच्या खाद्यपदार्थांची ते चर्चा करायचे; पण त्यांना सहज म्हणून पहिने येथील प्रवासादरम्यान काळ्या मसल्याच्या मटणाविषयी माहिती दिल्यानंतर दोन- चार दिवस त्यांनी काळ्या मसाल्याचे मटण आणि भाकरी आवडीने खाल्ली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त