महिलांनो ''त्या'' दिवसांत काळजी घेताय न?...कारण

periods.jpg
periods.jpg

नाशिक : मासिक पाळीचा थेट संबंध हा महिलांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे या दिवसांत काळजी न घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्‌भवू शकतात. जंतुसंसर्ग, फंगल किंवा बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन होऊ शकते. यामुळे भविष्यात गर्भाशयाचा कॅन्सर, वंध्यत्व आदी गंभीर आजारही होऊ शकतात. 

स्त्रियांच्या शरीरावर घातक परिणाम

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी पॅडचा वापर करण्याकडे स्त्रियांचा अधिक कल आहे. मात्र, कमी गुणवत्ता असलेल्या पॅडच्या वापरामुळे जंतु संसर्ग, खाज येणे यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी चांगली गुणवत्ता असलेले पॅड वापरावे. रक्तस्रावाच्या प्रमाणानुसार दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पॅड बदलावे. बऱ्याचदा स्त्रिया एकच पॅड दिवसभर वापरतात. याचा स्त्रियांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. 

हे करावे
 

* सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप वापरतांना ते उत्तम दर्जाचे असावेत. 
* दिवसातून दोनदा अंघोळ करावी. 
* मासिक पाळीदरम्यान घरगुती कापडी पॅड वापरल्यास ते स्वच्छ धुऊन उन्हात वाळत घालावे. कापडाला शिवण, बटण नसावे याची खात्री करून घ्यावी. 
* पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हामध्ये कापड घालणे शक्‍य नसल्यास या कापडांना इस्त्री करावी. 
* लोह आणि कॅल्शिअमयुक्त आहाराचे सेवन अधिक करावे. 
* यादरम्यान हलका व्यायाम करावा. त्यामुळे पाळीच्या काळात भेडसावणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. 
* भरपूर पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्‌भवत नाही. 


हे करू नये 

* शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी दूध-दही खाल्ले जाते. मात्र, मासिक पाळीदरम्यान हे पदार्थ खाऊ नयेत. 
* मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी डेअरी प्रॉडक्‍ट आणि वेफर्स खाऊ नयेत. 
* या दिवसांत शरीर कमकुवत झालेले असते. त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणून यादरम्यान खाण्यापासून वाचणे किंवा न खाणे, यामुळे त्रास होऊ शकतो. 
* मासिक पाळीदरम्यान इतरांचे कपडे वापरू नये. 

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..
 
मासिक पाळीदरम्यान योग्य काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग आणि फंगल इन्फेक्‍शन होऊ शकते. यामुळे गर्भाशयाशी निगडित अनेक गंभीर आजार होण्याची शक्‍यता वाढ ते. महिलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. - डॉ. विकास गोऱ्हे, स्त्रीरोगतज्ज्ञ 

मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता ठेवली नाही तर बॅक्‍टेरियल आणि फंगल इन्फेक्‍शन होऊ शकते. गंर्भाशयाला इन्फेक्‍शन झाल्यास त्यावर योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. हे इन्फेक्‍शन 10 ते 15 वर्षांसाठी राहिले तर गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. - डॉ. ज्योत्स्ना जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com