#COVID19 : कोरोनाची जन्मभूमी थेट चीनमधून नामपूरचा तरुण सांगतोय "आपबिती"..म्हणतोय..

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

याकाळात केवळ भाजीपाला, दूध, अंडी, ब्रेड मिळतील एवढीच दुकाने उघडी होती. बाकी दुकाने सरकारने सील केली होती. रत्यावर कामाशिवाय फिरण्यास बंदी होती. एका शहरातील व्यक्तीला दुसऱ्या शहरात जाण्यास बंदी होती. शेजारील गावात रेशन कार्ड दाखवल्याशिवाय प्रवेश मिळत नव्हता. अत्यंत कठोर नियम होते.​ पुढील दोन तीन आठवडे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे कळकळीचे आव्हान मिलिंदने थेट चीनमधून केले आहे.

नाशिक / नामपूर : चीनमधून सुरु झालेली कोरोना विषाणू विरुद्धची लढाई संपूर्ण जगात आपले पाय पसरवत आहे. महामारीचे जागतिक संकट जिल्ह्याच्या सीमेवर येवून धडकल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य, महसूल, स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. येथील ऐतिहासिक झेंडाचौकातील रहिवासी व सध्या चीनमधील वुशी शहरात राहणाऱ्या मिलिंद अलईने व्हाट्सएप्पद्वारा कोरोनाबाबत जनजागृती सुरु केली आहे. चीनमधील 'आँखोंदेखा हाल'  त्याने आपल्या पोस्टमधील मांडल्याने सोशल मिडियात त्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 

थेट चीनमधून नामपूरचा मिलिंद करतोय कोरोनाची जनजागृती 

नामपूरच्या आनंद जनरल स्टोअर्सचे संचालक सदाशिव अलई यांचा लहान मुलगा असलेला मिलिंदने औषध निर्माण शास्त्रात उच्च शिक्षण घेतल्याने त्याला २०१३ मध्ये तैवान आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची पीएचडी मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त चीनमध्येच वुशी शहरात मिलिंद स्थायिक झाला. हे शहर शांघाय पासून २०० किमी आणि ज्या ठिकाणी कोरोना विषाणूने थैमान घातले, त्या वूहान शहरापासून ९०० किमी अंतरावर आहे. मिलिंदने सकाळला सांगितले की, माझ्या शहरात २३ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत ५५ रुग्ण आढळले. तीन आठवडे संपूर्ण शहर आणि संपूर्ण चीन बंद होते. बस, रेल्वे, विमान सेवा, रस्ते, सर्व बंद करण्यात आले होते. आपल्या खाजगी वाहनाने बाहेर जाऊ शकत होतो. पण अगदी तुरळक आणि अत्यावश्यक कामासाठीच  लोक बाहेर पडत होते. बाहेर पडताना मास्क घालण्याची सक्ती होती आणि आजही ती आहे. 

कोणी जर विनामास्क आढळला तर...
कार, बाईक आणि पादचारी जर विनामास्क आढळला तर पोलिस त्याला अटक करून घेवून जाणार. समाजाला धोका पसरावल्याच्या आरोपाखाली त्यांना काही काळासाठी तुरुंगात डांबण्यात आले. परंतु हे प्रमाण अगदी कमी प्रमाणात होते. कारण येथील लोक सरकारचा आदेश अगदी मनापासून ऐकतात आणि त्याचे अनुकरण करतात. कारण नाही ऐकले तर कठीण परिणाम भोगणे आले.

या काळात मनात अत्यंत भीती होती. परंतु...

याकाळात केवळ भाजीपाला, दूध, अंडी, ब्रेड मिळतील एवढीच दुकाने उघडी होती. बाकी दुकाने सरकारने सील केली होती. रत्यावर कामाशिवाय फिरण्यास बंदी होती. एका शहरातील व्यक्तीला दुसऱ्या शहरात जाण्यास बंदी होती. शेजारील गावात रेशन कार्ड दाखवल्याशिवाय प्रवेश मिळत नव्हता. अत्यंत कठोर नियम होते. पण या काळात हे गरजेचे होते. या काळात मनात अत्यंत भीती होती. परंतु योग्य काळजी घेतली तर घाबरण्याचे काही कारण नाही.

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

सध्या माझ्या शहरातील सर्व रुग्ण बरे होवून घरी गेलेत. कोणीही दगावले नाही. म्हणजे काय तर योग्य काळजी आणि उपचार घेतले तर रुग्ण ठणठणीत बरा होवू शकतो. दुर्दैवाने कुणाला झाला पण तर घाबरण्याचे कारण नाही. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind aalai of Nampur is doing Corona tribe awareness from China Nashik Marathi News