esakal | अशांना पोलिसी खाक्या दाखवण्यावाचून पर्याय नाही : छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bh 1111.jpg

कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात नाशिकमध्ये मुख्य बाजारातील अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी ते बाजार पेठेत आले होते. शहरातील अतिसंवेदनशील भागात अद्यापही शासकीय नियमांचे आदेश पाळताना दिसत नाही. नागरिक खुलेआम गर्दी करताना दिसत असून याठिकाणी नागरिक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

अशांना पोलिसी खाक्या दाखवण्यावाचून पर्याय नाही : छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवला तर ठिकाणावर येतील असे मत अन्न , नागरी पुरवठा मंत्नी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

जो ऐकणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रोगाला समोरे जावे लागेल

कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात नाशिकमध्ये मुख्य बाजारातील अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी ते बाजार पेठेत आले होते. शहरातील अतिसंवेदनशील भागात अद्यापही शासकीय नियमांचे आदेश पाळताना दिसत नाही. नागरिक खुलेआम गर्दी करताना दिसत असून याठिकाणी नागरिक पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवला तरच सर्व ठिकाणावर येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जो ऐकणार नाही त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रोगाला समोरे जावे लागेल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड करण्याची आवश्यकता नाही

संचारबंदीच्या काळात अन्न धान्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा खाते लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून या  छगन भुजबळ यांनी (ता.४) मध्यवर्ती असलेल्या बाजार पेठेत येऊन किराणा दुकानदारांशी संवाद साधत आढावा घेतला. एप्रिल महिन्यात पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी कधीही झुंबड करण्याची आवश्यकता नसल्याचे भुजबळ त्यांनी सांगितले.   

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!