Onion Export Ban : महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

दिगंबर पाटोळे
Friday, 18 September 2020

केंद्र सरकारवर दबाव वाढवायचा असेल व खरच स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या  केंद्रीय मंत्र्यांना कणव असेल तर  हरसिमरत कौर बादल यांचा आदर्श घेऊन राज्यातील  केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

नाशिक / वणी : कांद्याला थोडा भाव वाढला म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध केला. परंतु केंद्र सरकारने अजून कुठलंही सकारात्मक पाऊल उचललं नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवली नाही. केंद्र सरकारवर दबाव वाढवायचा असेल व खरच स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या  केंद्रीय मंत्र्यांना कणव असेल तर हरसिमरत कौर बादल यांचा आदर्श घेऊन राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.राज्यातील शेतकरी कष्टकरी या सगळ्या लोकप्रतिनिधींना डोक्यावर घेतील .असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलं आहे.

हरसिमरत कौर बादल यांचा आदर्श घ्या

कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता.या भावानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही.पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला.पण तो ही कांदा  चाळीत सडला.थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय .त्याला आता समाधानकारक दर मिळतोय पण झालेलं नुकसान बघता शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले व  शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही गेला. कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे.त्यामुळे केंद्र सरकारने ही निर्यात बंदी तात्काळ मागे घेणं गरजेची आहे.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ministers in Maharashtra should resign demand of Swabhimani Shetkari Sanghatana nashik marathi news