घराचा स्लॅब पडला बालकाच्या डोक्यावर...घरकुल कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा चर्चा

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 मे 2020

जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजने अंतर्गत सावित्रीबाई फुले नगर येथे ही घरे बांधण्यात आली आहेत. मंगळवारी (ता.19) रात्री बालकावर पडला. दरम्यान हे काम निकृष्ट दर्ज्याचे झाले असून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येतेय.

नाशिक / इंदिरानगर  : वडाळा येथील घरकुल योजनेतील घरकुला चा स्लॅबचा काही भाग अंगावर पडल्याने प्रमोद भालेराव (१२) हा बालक किरकोळ जखमी झाला.यामुळे येथील कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा चर्चा झाली आहे.  

कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा चर्चा

जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजने अंतर्गत  सावित्रीबाई फुले नगर येथे ही घरे बांधण्यात आली आहेत. मंगळवारी (ता.19) रात्री दत्ता भालेराव यांच्या सदनीकेच्या स्लॅबचा भाग त्यांचा मुलगा प्रमोद वर पडल्याने त्याला डोक्याला दुखापत झाली.दरम्यान हे काम निकृष्ट दर्ज्याचे झाले असून त्याची चौकशी करण्याची आणि पावसाळ्याच्या अगोदर या इमारतींचे बांधकाम तपासन्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष रमीझ पठाण यांनी केली आहे.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती

स्लॅब पडल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत बालकाला त्यातून बाहेर काढले. स्लॅब कोसळला त्यावेळी सुदैवाने त्या बालकाला किरकोळ जखम झाली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असा अंदाज नागरिकांनी बोलून दाखविला.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor injuries to child when the slab of the house fell nashik marathi news