''मराठा आरक्षण मुद्द्यावरून शरद पवारांविषयी पसरविले जाताएत गैरसमज''

महेंद्र महाजन
Friday, 11 December 2020

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत आहेत. आरक्षणच्या मुद्यावर बॅकस्टेज राजकारण करत आहेत. मराठा समजाचं नेतृत्व करणारे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही असे एक खासदार बोलतात त्यांचा काय अभ्यास? त्यामुळे शरद पवार यांच्या विषयी गैरसमज पसरविले जात असल्याची टिका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत आहेत. आरक्षणच्या मुद्यावर बॅकस्टेज राजकारण करत आहेत. मराठा समजाचं नेतृत्व करणारे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही असे एक खासदार बोलतात त्यांचा काय अभ्यास? त्यामुळे शरद पवार यांच्या विषयी गैरसमज पसरविले जात असल्याची टिका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको

ओबीसी आरक्षण काढून टाकावे यासाठी  प्रयत्न सुरू असून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आम्ही मोर्चे आंदोलनं काढणारच असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको ही मागणी आजही कायम आहे. काही लोक ओबीसी आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब सराटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसण्याची शक्यता आहे. बाळासाहेब सराटे सर्व भानगडी करत आहेत, मागे सर्वेक्षण झाले तेव्हा त्यांचीच कंपनी होती, आता याचिका तेच दाखल करत आहेत अशी टिकाही छगन भुजबळ यांनी केली आहे,

ओबीसी समाजाचे मोर्चे मराठा मोर्चाना उत्तर नाही

मराठा आरक्षणा संदर्भात 25 तारखेला सुनावणी होईल त्यावेळी बाळासाहेब सराटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ओबीसी समाजाचे मोर्चे मराठा मोर्चाना उत्तर नाही तर आमच्या न्याय मागण्यांसाठी आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून कुठलीही भरती आली तर ती थांबते. ओबीसी मध्ये बराचसा ओबीसी समाज कुणबी म्हणून आलाय, त्यातून नोकरी मिळेल. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

मराठाला आरक्षण मिळावे हीच अपेक्षा
-mpsc पासून सर्व भरती थांबली आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार सबुरी ने घेत आहे. आरक्षण देण्याची घोषणा 2013/14 मध्ये आघाडी सरकारने केली होती. शरद पवार यांच्या विषयी गैरसमज पसरविले जात आहे. ओबीसीला आरक्षण खूप पूर्वी मिळाले आहे. आयोगाने आरक्षण दिले, मुख्यमंत्री केवळ अंमलबजावणी करत असतात, आमच्यावर मराठा विरोधी म्हणून आरोप होत आहेत, नोकर भरती करायला जातो तेव्हा मराठा समाज विरोध करतो. बॅक स्टेज राजकरण सुरू आहे, पवारांनी आरक्षण होऊ दिले नाही असे भाजपचे खासदार म्हणताय त्यांचा काय अभ्यास आहे. भाजपचे दोन्ही खासदार नेतृत्व करत आहेत. कोण राजकारण करत आहे समजून घ्यावे. कोर्टात चांगले वकील उभे केलेत मराठाला आरक्षण मिळावे ही अपेक्षा आहे. ओबीसी चे मोर्चे सुरूच राहतील.

हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misconceptions are being spread about Sharad Pawar said chhagan bhujbal nashik marathi news