नाशिक विमानतळाचे खरे नाव नेमके आहे तरी काय? प्रवाशांची होतेय दिशाभूल

संदिप मोगल
Wednesday, 16 December 2020

बाहेरील राज्यातून आलेल्या प्रवाशांना विमानतळाच्या दोन ते तीन नावामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. अनेक प्रवासीना अनेक ठिकाणच्या बोर्डावर ओझर विमानतळ नाव असल्यामुळे नाशिक एअरपोर्टला येण्याच्या बदली प्रवासी ओझर गावला  जातात आणि पुन्हा ओझर वरून जानोरी गावाला येतात

लखमापूर (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नाशिक पासून वीस किलोमीटर असलेल्या जानोरी गावातील नाशिक एअरपोर्टला आतापर्यंत विमानतळाचे खरे नाव काय आहे हे समजले नाही. नेमकी काय भानगड आहे वाचा पुढे....

ग्रामस्थांमध्ये नावाबद्दल संभ्रम निर्माण

ओझर ग्रामस्थ ओझर विमानतळ या नावाने ओळखतात तर जानोरी ग्रामस्थ जानोरी विमानतळ नावाने ओळखतात आणि शासनाने या विमानतळाला नाशिक एअरपोर्ट असे नाव दिले आहे. त्यामुळे प्रवासी व ओझर आणि जानोरी ग्रामस्थांमध्ये या नावाबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. त्यातच जानोरी करांनी विमानतळासाठी आपल्या स्वाताच्या जमीन देऊन पण जानोरी गावचे नाव विमानतळाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त
 जानोरी येथे 2013 ते 2014 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ हे असताना त्याच्या  अथक प्रयत्नाने एचएएल हद्दीत जानोरी लगत विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या विमानतळाला जानोरी ग्रामस्थांची जमीन गेलेल्या आहे. जानोरी हद्दीतच विमानतळाची इंट्री ठेवण्यात आली आहे . त्यामुळे विमानतळाला मोठा रस्ता लागतो म्हणून रस्त्याची अडचण येऊ लागली.म्हणून  विमानतळासाठी मोठा रस्ता तयार करण्यासाठी जानोरी शेतकऱ्यांनी सरकारच्या मोबदल्यात शेतीचे काही क्षेत्र देण्यात आले. एवढेच नाही तर जानोरी ग्रामपंचायतीने ही वेळोवेळी  मदत करून विमानतळासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता केली. कारण जानोरी करांना आशा होती की आपल्या हद्दीत विमानतळ होत आहे.  त्यामुळे जानोरी ग्रामस्थांनी वेळोवेळी मदत करूनही विमानतळाचे नाव जानोरी विमानतळ असे दिले नसल्याने जानोरी  ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

गावातील तरुण बेरोजगार आजही रोजगारापासून वंचित
गावाची लोकसंख्या अंदाजे नऊ ते दहा हजार असून गावात अनेक तरुण बेरोजगार आहे. सन 2013 साल सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे हे असताना नाशिक जिल्ह्यासाठी नाशिक एअरपोर्ट बनवण्यात येत आहे.  विशेष म्हणजे हे एअरपोर्ट आपल्या जानोरी गावात होत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना अपेक्षा होते की आपल्याला विमानतळा मध्ये साफसफाईचे का होईना काम मिळेल परंतु असे न होता सर्व तरुणांच्या अपेक्षाभंग झाले असून जानोरी गावातील तरुण बेरोजगार आजही रोजगारापासून वंचित आहे. त्यामुळे गावातील अनेक युवकांना मजुरी शिवाय पर्याय नाही.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

दोन ते तीन नावामुळे प्रवाशांची दिशाभूल  

बाहेरील राज्यातून आलेल्या प्रवाशांना विमानतळाच्या दोन ते तीन नावामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. अनेक प्रवासीना अनेक ठिकाणच्या बोर्डावर ओझर विमानतळ नाव असल्यामुळे नाशिक एअरपोर्टला येण्याच्या बदली प्रवासी ओझर गावला  जातात आणि पुन्हा ओझर वरून  जानोरी गावाला येतात. जानोरी  ग्रामस्थांना विमानतळाचा पत्ता विचारतात. त्यामुळे शासनाने विमानतळाला जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misleading passengers for airport has a different name nashik marathi news