"राहिले दूर घर माझे" भांबावलेल्या अवस्थेत आठ वर्षाचा गोट्या वाट चुकतो तेव्हा...काय घडले नेमके? 

दिगंबर पाटोळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आठ वर्षाचा गोट्या खेळता खेळता गल्लीतून मुख्य रस्त्यावर घरापासून दूर आला.. व अचानक भांबावून  दुसऱ्याच रस्त्याने घराच्या शोधार्थ फिरु लागला.. घरही काही दिसेना.. नवीन रस्ता...नवी गल्ली दिसू लागल्याने तो अधिक घाबरला आणि रडू लागला.. अन् मग पुढे असे घडले की...

नाशिक / वणी : आठ वर्षाचा गोट्या खेळता खेळता गल्लीतून मुख्य रस्त्यावर घरापासून दूर आला.. व अचानक भांबावून  दुसऱ्याच रस्त्याने घराच्या शोधार्थ फिरु लागला.. घरही काही दिसेना.. नवीन रस्ता...नवी गल्ली दिसू लागल्याने तो अधिक घाबरला आणि रडू लागला.. अन् मग पुढे असे घडले की...

खेळता खेळता आरुष चुकला घरचा रस्ता

शिर्डी येथील कालिका नगर परिसरात राहाणारा आरुष प्रकाश माडकर उर्फ गोट्या (वय ८) हा इयत्ता दुसरी इयतेत शिकणारा मुलगा खेळण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान बाहेर पडला. गोट्या खेळता खेळता तो दुसऱ्याच गल्लीत गेला व घराचा रस्ता चुकल्याने रडणाऱ्या आरुष यास काही व्यक्तींची विचारपूस केली. मात्र त्याला नाव व्यवस्थित सांगता आले नाही.. मात्र गांव तळेगाव-दिंडोरी असे सांगितल्याने स्थानिकांनी मुलगा बाहेर गावचा असल्याबाबत खात्री झाल्याने त्यास शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.

अखेर शोधमोहीम सुरू झाली.

यावेळी पोलिसांनाही आरुषने त्याच्या गावाचे नाव तळेगाव दिंडोरीच सांगितले. त्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घुगे यांनी दिंडोरी व वणी पोलीस स्टेशन यांच्याकडे सदर मुलाचा फोटो व त्याने सांगितलेले नाव पाठविले व शोधमोहीम सुरू झाली. त्यानंतर वणी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी आपल्या पोलिस ठाण्यात मिसिंग सदर्भात कुठलीही तक्रार दाखल नसल्याने चौकशीसाठी सदर मुलाचा फोटो व नाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्व पोलीस पाटलांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविण्यात आले. व आपआपल्या परिसरात माहिती घेण्याचे सांगितले. दिंडोरी तालुक्यात दोन तळेगांव असल्यामुळे तळेगाव वणीचे पोलिस पाटील  प्रकाश मोरे व तळेगाव दिंडोरीचे पोलिस पाटील रोशन परदेशी यांनी हा मुलगा आमच्या परिसरातील नाही असे सांगितले. दरम्यानची सदर मुलाचा फोटो व नाव हे दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार ग्रुपवर पत्रकार अशोक निकम यांनी टाकून आपआपल्या भागात चौकशी करण्यास सांगितले. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार हे तळेगाव दिंडोरीचे असल्याने त्यांनी आपल्या गावातील ग्रुपवर सदर मुलाचा फोटो व नाव टाकल्यावर सदरचा मुलगा तळेगांव दिंडोरी येथील नसून त्याच्या मामाचे गावं तळेगांव दिंडोरी असल्याचे माहिती मिळाली. यानंतर गावातील काही युवक मुलाच्या मामाकडे गेल्यानंतर युवकांनी संतोष कथार यांना फोन करुन त्याच्या मामाशी बोलणं करून दिलं.

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

आजीला व पालकांना पोलिस ठाण्यात बोलवले

याबाबतची माहिती कथार यांनी लगेच शिर्डी येथील त्या मुलाची आजी ताराबाई बिडकर यांच्याशी फोन वरून संपर्क करून मुलगा हरवल्याची केली. व त्या आजीचा मोबाईल नंबर वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी व  शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मिथुन घुगे  यांना पाठवून मुलाची मिळालेले माहिती दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक घुगे यांनी त्या मुलाच्या आजीला व पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून मुलास ताब्यात दिले. या मुलाला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहविण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मिथुन घुगे, वणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सागर शिंपी, शिर्डी पोलीस स्टेशनचे दिपक गंधाले, शिंदे, दिंडोरी, वणी, व शिर्डी  पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी, सर्व पोलीस पाटील, तालुक्यातील पत्रकार,  सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

रिपोर्ट - दिगंबर पाटोळे

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: missing Aarush Madkar forgot his home vani nashik marathi news