esakal | "सराफ मृत्यूप्रकरणी तेलंगणा पोलिसांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा" 
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani Pharande.jpg

तेलंगणा पोलिसांनी राज्यातील स्थानिक पोलिसांची परवानगी न घेता बिरारी यांना अटक केली ही बाब स्पष्ट करीत, बिरारी यांच्या कुटुंबीयांना अटकेची माहितीदेखील दिली नाही. बिरारी यांना कोणत्याही न्यायालयात दाखल न करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे बिरारी यांच्या नातेवाइकांकडून तेलंगणा पोलिसांकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.

"सराफ मृत्यूप्रकरणी तेलंगणा पोलिसांविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा" 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील 25 फेब्रुवारीला येथील सराफ विजय बिरारी यांच्या मृत्यू प्रकरणी विधानसभेत बुधवारी (ता. 4) चर्चा झाली. त्यात तेलंगणा पोलिसांवर कारवाईची मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. 

आमदार फरांदे यांची मागणी; विधानसभेत चर्चा 

तेलंगणा पोलिसांनी बिरारी यांना त्यांच्या दुकानातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 25 फेब्रुवारीला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या विषयावर बुधवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रा. फरांदे यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

बिरारी यांच्या कुटुंबीयांना अटकेची माहितीदेखील दिली नाही

तेलंगणा पोलिसांनी राज्यातील स्थानिक पोलिसांची परवानगी न घेता बिरारी यांना अटक केली ही बाब स्पष्ट करीत, बिरारी यांच्या कुटुंबीयांना अटकेची माहितीदेखील दिली नाही. बिरारी यांना कोणत्याही न्यायालयात दाखल न करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे बिरारी यांच्या नातेवाइकांकडून तेलंगणा पोलिसांकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. मृत बिरारी यांची लिगामेंटची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना पळणे किंवा वर चढणे शक्‍य नसताना त्यांनी वर चढून आत्महत्या कशी केली, असा प्रश्‍न नातेवाइकांनी उपस्थित केला असल्याचे प्रा. फरांदे यांनी सभागृहात सांगून या संशयास्पद प्रकरणात तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानसभेत केली. विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी यात चौकशीचे आदेश दिले.  

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...