esakal | नाशिक पोलीसांचा खुलासा! बनावट ई-पास विरोधात तक्रारही मनसेचीच अन् आरोपीही मनसेचाच पदाधिकारी; वाचा सविस्तर प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

epass.jpg

लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पासचाही काळा बाजार सुरूच आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे

नाशिक पोलीसांचा खुलासा! बनावट ई-पास विरोधात तक्रारही मनसेचीच अन् आरोपीही मनसेचाच पदाधिकारी; वाचा सविस्तर प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्‍यक आहे. ई-पासशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्‍य नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या ई-पासचाही काळा बाजार सुरूच आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्क

नाशिक पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

बनावट ई-पास बनवणारा संशयित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) तालुका पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एकाला डोंबिवलीतून अटक केली. कृष्णा उर्फ राकेश सुर्वे असं आरोपीचं नाव असून तो रत्नागिरीचा रहिवासी आहे. राकेश हा मनसेचा तालुका पदाधिकारी आहे. तो गुहागरचा मनसे तालुका संपर्क सचिव आहे. राकेश बनावट ई-पास तयार करून गरजूंना 2 हजार रुपयांत विकत होता. आरोपी राकेश सुर्वे याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, टॅब जप्त केली आहे

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले

मनसेचं पितळ उघडं पडलं

बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा, अशी तक्रार मनसेचे संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, आता पोलिस तपासात मनसेचं पितळ उघडं पडलं आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.